सामाजिक

अन… गजराज रस्त्यावर धावत सुटले : नागरिक कुतुहलवश पाहत राहिले

Spread the love

               समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मध्ये अनेक प्रकारचे व्हिडीओ असतात. त्यात प्राण्यांचे देखील व्हिडीओ असतात. मागे सिंहाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात दिसत होते की काही लोकं जंगल सफारी करत असताना ते वाघ , सिंह  यांना शोधत होते. आणि त्यांच्या वाहनाच्या बाजूलाच सिंह उभा होता. त्यावेळी त्यांची काय अवस्था होती हे त्यांच्या चेहऱ्यावरील क्षणखणात बदलणाऱ्या हावभावा वरून  पहायला मिळते. आता एका गजराजचा व्हिडीओ सोशलइडियावरल

हा व्हायरल व्हिडीओ भारतातील कोणत्याही शहरातील नसून अमेरिकेतील मोंटाना शहरातील आहे. मंगळवारी दुपारी मोंटाना शहरात अचानक रस्त्यावर हत्ती सैरावैरा पळताना दिसला आणि हे पाहून नागरीकांची एकच तारांबळ उडाली. अनेक जण असे रस्त्यावर हत्तीला पाहून अवाक् झाले. काही लोकांनी ही घटना त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हत्ती रस्ता ओलांडताना दिसत आहे. विशेष म्हणजे या हत्तीने कोणत्याही प्रकारची नासधूस केलेली नाही. हत्ती वाहनाच्या मधोमध नीट जाताना दिसतोय. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की या हत्तीमागे एक व्यक्ती हातात काठी घेऊन धावत आहे. कदाचित ती सर्कसमधील व्यक्ती असावी जी हत्तीला थांबविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा सुरू आहे. अनेक जण हा व्हिडीओ शेअर करत आहे. यापूर्वी सुद्धा रस्त्यावर पळत सुटलेल्या हत्तीचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे.

Crime With Bobby या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘मोंटानामध्ये मोकाट सुटलेला हत्ती’ या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close