शैक्षणिक

धक्कादायक ….. शिक्षिकेला भर वर्गात मारहाण 

Spread the love
गाजियाबाद  / नवप्रहार मीडिया 

 
               ज्या ठिकाणी देशाचे भविष्य घडवले जाते. ज्याला ज्ञानाचे मंदिर म्हटल्या जाते त्याच ठिकाणी शिक्षकांमध्ये हाणामारी , शिवीगाळ अश्या घटना घडत आहेत. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार विद्यार्थ्यांच्या समोरच घडत आहे. शिक्षिकेला भर वर्गात विद्यार्थ्यांसोर मारहाण केल्याचा धक्कादायक आणि लाजीरवाणी बाब गजियाबाद जिल्ह्यातील मसुरी येथील जयप्रकाश नारायण सर्वोदय विद्यालयात हा प्रकार घडला आहे.
 

निगरावठी गावाची रहिवासी असलेली दलित शिक्षिका अंशिका हिने पोलिसांना केलेल्या तक्रारीत म्हंटले की, 4 मार्च रोजी शाळेतील मुख्याध्यापिका पूनम कुशवाहा यांनी अंशिकाला कॉम्पुटर विषयाऐवजी इतर विषयांचे वर्ग घेण्यास सांगितले. अंशिकाने अनेकदा नकार देऊन देखील मुख्याध्यापिका तिच्यावर दबाव टाकत होती. तेव्हा अंशिका हिने मुख्याध्यापिकेची तक्रार उच्च अधिकाऱ्यांशी केली ज्यांनी तिला कॉम्पुटर विषय सोडून इतर कोणताही विषय न शिकवण्यास सांगितले होते.
अंशिकाने आरोप केला आहे की जेव्हा ती तक्रार करून पुन्हा कॉम्पुटर लॅबमध्ये गेली आणि काम करू लागली तेव्हा मुख्याध्यापिका तेथे पोहिचली. मुख्याध्यापिकेने तिची केसं पकडून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच मुख्याध्यापिकेने तिला जातीवाचक शिवीगाळ देखील केली.
गाझियाबाद येथील घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मसुरीचे सहाय्यक पोलीस आयुक्त नरेश कुमारने सांगितले की, पीडितेने दिलेल्या जबाबानुसार भारतीय दंड संहितेची धारा 323, 506 आणि अनुसूचित जाति जमाती अधिनियमानुसार या प्रकरणाबाबत तपास केला जात आहे
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close