Uncategorized

शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे 67 वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा

Spread the love

 

भंडारा( प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील गोसेखुर्द धरणाला लागून असलेले शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे 67 वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी तथागत गौतम बुद्ध ,जगविख्यात राजा प्रियदर्शी सम्राट अशोक, अशोक स्तंभ व बोधिसत्व भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे म्हणाले की ,14 ऑक्टोबर 1956 ला डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतावादी धर्माला नाकारून विज्ञानवादी धर्माचा स्वीकार करून बुद्धाला नतमस्तक झाले. यावेळी आशिष मेश्राम ,अंबादास मेश्राम व इतर मान्यवर उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close