पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीतर्फे पूजन संपन्न
यवतमाळ / प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्धी वर्षानिमित्ताने १ जून २०२४ ते ३१ मे २०२५ हे वर्ष त्रीशताब्धी वर्ष म्हणून साजऱ्या केल्या जाणार आहे,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती यवतमाळ तर्फे साप्ताहिक पूजन केल्या जात आहे,त्यानिमित्ताने रविवार दि.१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता सत्ताविसावे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तैलचित्राचे डॉ.अशोकराव पुनसे व सौं.मालाताई पुनसे यांच्या हस्ते पार पडले.यावेळेस शोभाताई पुनसे,प्रांजली थोटे,कल्पना मोहोड,मंगला मोहोड,मालाताई पुनसे,डॉ.अशोकराव पुनसे,सुरेश भावेकर,राजेश मदने,पवन थोटे,अमोल शिंदे,चारुदत्त पूनसे आदी समाज बांधव मोठ्याप्रमाणात उपस्थित होते,यानंतर प्रत्येक रविवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पूजन केल्या जाणार आहे तरी समाज बांधवानी प्रत्येक रविवारी होणाऱ्या साप्ताहिक पूजनाला उपस्थित राहण्याचे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती यवतमाळ तर्फे पवन थोटे यांनी केले आहे.