पवनी तालुक्यातील ब्राह्मणी येथे जिल्हास्तरीय मशरूम लागवड प्रशिक्षण शिबिर संपन्न
भंडारा ( प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील ब्राह्मणी येथे जिल्हास्तरीय मशरूम लागवड प्रशिक्षण दिनांक 26/ 10 /2023 ला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा भंडारा व तालुका कृषी अधिकारी पवनी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा ब्राह्मणी येथे पायलट मशरूम फॉर्म ब्राह्मणी या ठिकाणी जिल्हास्तरीय मशरूम लागवड प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते .सदर जिल्हास्तरीय मशरूम लागवड प्रशिक्षण करिता उद्घाटक म्हणून ब्राह्मणी येथील सरपंच श्रीमती माधवी ईखार उपस्थित होत्या .तर प्रमुख उपस्थितीत प्रकल्प उपसंचालक आत्मा भंडारा अजय राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच तालुका कृषी अधिकारी पवनी आदित्य घोगरे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून पायलट मशरूम फॉर्म ब्राह्मणीचे संचालक अनंत इखार उपस्थित होते. सदर मशरूम लागवड प्रशिक्षण करिता भंडारा जिल्ह्यातून विविध तालुक्यांमधून मशरूम लागवड करू इच्छुक शेतकरी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणामध्ये मशरूमची ओळख, त्याचे प्रकार, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक द्वारे मशरूम बेड तयार करणे, पूर्वतयारी निर्जंतूकरण काळजी ,निसर्ग वातावरण व्यवस्थापन ,पिकाची काळजी ,इत्यादी गोष्टी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक द्वारे प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण अनंत ईखार यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले. तसेच मशरूमचे विविध पदार्थ तयार करणे, त्याचे मार्केटिंग व संधी याबद्दल मार्गदर्शन केले .प्रकल्प उपसंचालक आत्मा भंडारा अजय राऊत यांनी सदर तंत्रज्ञाने काटेकोर माहिती घेऊन शेतकऱ्यांनी व इच्छुकांनी त्या मशरूम उद्योगातून मशरूम उद्योगातून प्रगती साधावी असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदित्य घोरणे यांनी केले . संचालन कृषी पर्यवेक्षक भूमेश्वर येरणे यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सतीश वैरागडे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा भंडारा,कृषी सहाय्यक भुरे कुमारी वैद्य मॅडम यांनी सहकार्य केले.