लोक कल्याणकारी जागर करत गणेश उत्सव साजरा
घाटंजी ता प्रतिनिधि – सचिन कर्णेवार
घाटंजी-नेहरु नगर येथिल बाल गणेश मंडळ गणेश उत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम घेत गेल्यां ३९ वर्षा पासून कार्यरत आहे. यांदा या मंडळाने महीला सशक्तिकरण, कायदेविषय मार्तागदर्शन शिबीर, आरोग्य शिबीर, तसेच १४/९/२४ ला खास लोकजागृती,अंधश्रध्दा निर्मूलन, व्यसनमुक्ती पर ॲड. गजेन्द्र ढवळे सर राष्ट्र निर्माण विचारधारा संच चा संगीतमय समाज प्रबोधनपर कार्यक्रम घेत लोक जनजागृती केली. असे विवीधकार्य करण्यामागचा हेतू हाच की गणेश उत्सव काळात केवळ मूर्ती स्थापना करून चालणार नाही तर त्या गणरायाला स्थापण करण्या मागचा खरा हेतू समाज येकोपा, समाजात बंधुभाव स्थापन करून सशक्त समाज घडवीणे आहे. तसेच व्यसनमुक्ती ,अंधश्रध्दा,समाजात जाति-पाति चे तेढ न राहता भारत देश सशक्तिकरण आहे. ३९ वर्षा पासून अशा विविध लोक कल्याणकारी कार्यातून ह्या मंडळाने गेल्या कार्य करत सन २०१२ ते २०१८ पर्यंत तालुका स्त्तरावर प्रथम, द्वितीय पारितोषिक पटकावले आहे. यंदाही लोक कल्याणकारी कार्याचा जागर करत मंडळाचे कार्य अखंडीत आहे. या कार्यासाठी मंडळातील पदाधिकारी,महिला मंडळ परिश्रम घेत आहे.
०००००००००००००००००