सामाजिक

जिजाऊ ब्रिगेड च्या वतिने कुलट वरुड येथील घटनेचा निषेध

Spread the love

 

दर्यापूर / प्रतिनिधी

नुकतेच जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने दर्यापुर तालुक्यातील वरुड कुलट येथे घडलेल्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा तिव्र निषेध नोंदविण्यात आला. वरूड कुलट येथे एका ६५ वर्षीय नराधमाने ३ वर्षीय बालीकेवर अत्याचार केले. सदर आरोपी वर पोक्सो अंतर्गत तीव्र गुन्हे दाखल करण्यात येवुन फाशीची शीक्षा देण्यात यावी म्हणुन जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने येवदा पोलिस

स्टेशन येथे ठाणेदार विवेक देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, दर्यापुर येथे निवेदन देण्यात आले. यावेळी ठाणेदारांनी तपास काळजीपुर्वक व जलद गतीने करू असे सांगीतले. तसेच पिडीतेच्या घरी

जिजाऊ ब्रिगेड शी बोलतांना भेंट देण्यात आली. यावेळी जिजाऊ ब्रिगेड च्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ अश्विनी देवके, जिल्हाध्यक्ष डॉ अंजली

जवंजाळ, जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष शिल्पा लोडम,मा.जि प सदस्या शिवानी ताई महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष जयश्री चव्हाण, वंदना करूले, ग्राम शाखा अध्यक्ष वसुधा देशमुख, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्यकारणी च्या डॉ शुभांगी टोळे, डॉ ज्योती हावरे, डॉ सुषमा देशमुख, अनीता सदाफळे तसेच डॉ जयश्री पाटील, ज्योती बोबडे व असंख्य महीला उपस्थीत होत्या. यावेळी महीलांनी तिव्र स्वरूपात भावना व्यक्त केल्या, आरोपी ला आमच्या स्वाधीन केल्यास आम्ही योग्य तो धड़ा त्याला शिकवु असेही महीला पोलीसांना म्हणाल्या.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close