गुरुदेव’च्या आंदोलनाला पोलिसांना दडपले पोलिसांच्या हुकूमशाहीचा निषेध
मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आंदोलक आक्रमक
यवतमाळ : शेतकरी,दिव्यांग,पारधी बांधव तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या पूर्ततेसाठी ‘गुरुदेव’ने हिवाळी अधिवेशनावर पुकारलेले आंदोलन पोलिसांनी दडपले.मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ न देता पोलिसांनी हुकूमशाही दाखविली.पोलिसांच्या या कृत्याचा आंदोलकांनी निषेध नोंदविला.
गुरुदेव युवा संघाने हिवाळी अधिवेशनावर सर्वसामान्यांचा मोर्चा काढला.जिल्हास्तरावर प्रश्न सुटत नसल्याने मोर्चा काढण्याची वेळ आल्याचे गेडाम यांनी स्पष्ट केले.आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची आंदोलकांची मागणी पोलिसांनी हाणून पाडली.यावर मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज गेडाम यांनी ‘पुलिस की तानशाही नाही चलेगी’ आदिवासी कोन है जंगल का शेर है’ असं कस होत नाही भेट घेतल्याशिवाय राहत नाही आदी घोषणा देऊन आसमंत दणाणून टाकला.यशवंत स्टेडियमवरून निघालेल्या मोर्चाला झीरो पॉईंट चौकात अडविण्यात आले.या कृत्याचाही आंदोलकांनी निषेध नोंदविला.त्यानंतर पुढे सीआयडी कार्यालयात आंदोलकांना नजरकैदेत ठेवण्यात आले तरीही संविधानावर विश्वास ठेवत आंदोलकांनी आपली नारेबाजी सुरूच ठेवली.मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी एकाची भेट घेण्याची मागणी आंदोलकांची होती परंतु,पोलिसांनी ती पूर्ण होऊ दिली नाही.या घटनेचा गेडाम व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला.
आंदोलनामध्ये समाधान रंगारी शकील भाई,निसार अली,रितेश चौधरी, माया येलसरे,संतोष तिजारे,संदीप लोणकर,उमा आवारे,शारदा श्रीवास तसेच सुरेश मस्के यांच्यासह हजारो शेकडो आंदोलक सहभागी झाले होते.यामध्ये शेतकरी दिव्यांग,पारधी बांधव,पीडित शेतकरी तसेच वंचित लाभार्थ्यांचा समावेश होता.
प्रशासकीय भ्रष्टाचार,दिव्यांगांच्या मागण्या,घरकुलाची मागणी
नेर तालुक्यातील आजंती येथील ५६ पारधी बांधवांना जागेचे पट्टे,घरकुल तसेच मूलभूत सुविधांची पूर्तता,झरी तालुक्यातील सुरला येथील शेतकऱ्यांना शेतजमिनीचे पट्टे,दिव्यांगांच्या अर्थसहाय्य,योजना तसेच रोजगाराविषयक मागण्या यासोबतच उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अनागोंदी,जिल्हा शल्य चिकित्सकांच्या मनमर्जीने फोफावलेला भ्रष्टचार तसेच शासकीय रुग्णालयातील गैरसुविधेवर समाधान मिळावे याकरिता अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.परंतु,आंदोलकांना आपला मुद्दा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांपुढे मांडण्याची आंदोलकांची मागणी पोलिसांनी पूर्ण होऊ दिली नाही.