हटके

दुचाकींचा पाठलाग करत गाय थेट पेट्रोल पंपात घुसली

Spread the love

             सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या  व्हिडीओ पैकी काही अशी असतात की ते पाहिल्यावर असे ही होऊ शकते असे वाटते .सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक गाय दुचाकीचा पाठलाग करत पेट्रोल पंपात घुसते.आणि ती दुचाकीला धडक देते.ते तर त्यावर बसलेल्या लोकांचे भाग्य चांगले की त्यापैकी एक महिला चालत्या गाडी वरुन उडी घेत बाजूला धावत जाते. तर गाडी चालवणारा पुरुष गाडी सोडुन पळ काढतो. पण ती गाय गाडी मागे धावत येते आणि सरळ मशीन वर जाऊन धडकते. त्यामुळे मशीन चे सुद्धा नुकसान होते.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक पिसाळलेली गाय दुचाकी चालकाच्या मागे लागते. यावेळी दुचाकीवर एक पुरुष आणि महिला बसलेली दिसत आहे. हा बैल इतका पिसाळला आहे की तो त्यांची पाठच सोडत नाही. अखेर दुचाकी चालकाने आपली गाडी पेट्रोल पंपाकडे नेली. मात्र, पिसाळलेला बैल पेट्रोल पंपावरही पोहचला. अखेर गाडीवर मागे बसलेल्या महिलेने गाडीवरुन उडी मारली आणि स्वत:चा जीव वाचवला. नाहीतर गायीने महिलेवर मागून हल्ला केला असता. यावेळी महिला थोडक्यात बचावली आहे. मात्र पेट्रोल पंपावर असलेल्या मशीनला गायीने धडक दिल्यामुळे मशीनचं नुकसान झालं आहे. एखादा प्राणी पिसाळला तर त्याला शांत करताना भल्या भल्यांना घाम फुटतो.याचंच हे एक उदाहरण. हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ तुम्हीही एकदा पाहाच.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण चर्चा करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @onlyanimalz नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत ४० हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे स्पष्ट झालं नाही. प्राण्यांचे असे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच पहायला मिळतात. भटक्या प्राण्यांच्या अशा दहशतीमुळे लोकांच्या मनात भिती बसली आहे

बिथरलेला बैल कार चे समोरचे काच फोडत कर मध्ये घुसला –  नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.त्यात बैल कार ची काच फोडत कार मध्ये जाऊन घुसला होता.अर्थात कळपात असलेला हा बैल बिथरला होता.आणि त्यावेळी त्याने उडी घेतल्याने तो कार ची काच फोडत आत घुसला होता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close