राहूलगांधी समर्थणार्थ निषेध मोर्चा
युवक कॉंग्रेस व महाविकासआघाडी तर्फे निषेध आंदोलन
घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
तालुका प्रतिनिधी अरविंद चौधरी घाटंजी:- कॉँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी यांची खासदार व संसद पद रद्द करून लोकशाही विरोधी कारवाई केल्याबद्दल घाटंजी येथील पोलिस स्टेशन चौकात देशातील हिटलर शाही सरकारच्या विरोधात युवक कॉंग्रेस व महाविकास आघाडी तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘डरो मत’ व ‘लोकशाही वाचवा’ असे फलक हाती घेऊन ‘पहले लढे थे गोरो से, अब लढ रहे है चोरो से’, ‘मोदी हटाव देश बचाव’, राहुल जी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत निषेध करण्यात आला. यावेळी कॉँग्रेसचे माणिकराव मेश्राम, डॉ विजय कडू, किशोर भाई दावडा, परेश भाई करिया, सुभाष गोडे,अमृत पेंदोर, अनंत चौधरी, राजू मुनेश्वर, अरविंद चौधरी, घाटंजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मोरेश्वर वातीले, घाटंजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका अध्यक्ष मनोज ढगले, शहर अध्यक्ष प्रशांत मस्के,युवक कांग्रेस चे स्वानंद चव्हाण, सागर डंभारे, सुनील हूड, अक्षय पवार, जितेंद्र जुनघरे, गणेश उन्नरकर, गणेश वल्ल्फवार, अरविंद जाधव, राहुल दावडा, बबलू राठोड, अनिल बावणे, आशिष भोयर, करुणाकर लिहितकार,बुद्धदास उमरे,प्रशिक ढोके, रामदास राठोड, सौरव लूटे, पवन चव्हाण, इंदल चव्हाण, जितेश चव्हाण, विकी ढवळे तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी, इत्यादी महिला भगिनीं सुद्धा या आंदोलनात सहभाग घेतला होता.