प्रा.ज्ञानेश्वर बनसोडे यांचे राहुरी फॅक्टरी येथील कृष्णा निवास्थानी पंढरपूर येथील पायी दिंडी सोहळ्याचे भव्य स्वागत

,
राहुरी /( प्रतिनिधी)
मूळचे राहता तालुक्यातील साकुरी येथील व सध्या राहुरी फॅक्टरी येथे वास्तव्यास असलेले रयत शिक्षण संस्थेच्या शारदा विद्या मंदिर राहता येथील मा. शिक्षक श्री ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे यांचे राहुरी फॅक्टरी येथील निवास्थानी सालाबाद प्रमाणे सोमवार दि.23/6/2025 रोजी श्री.क्षेत्र जळगाव (गा.) ते पंढरपूर पायीं दिंडी सोहळ्याचे मुक्कामी भव्य दिव्य असे स्वागत केले..या पवित्र अश्या सोहळ्यात निवृती महाराज आळंदीकर यांच्या भजन.हरिपाठ
किर्तन.प्रवचन असे अंतर मनावर परीणाम कारक.असे कार्यक्रम सायंकाळचे वेळी दिव्यांच्या रोषणीत मोठ्या उत्साहत पार पडले आहे.. सदरचे पायी दिंडी सोहळ्याचा प्रारभ मिती ज्येष्ठ कृ.4 शनिवार दि.14/6/2025 ते सांगता सोमवार दि.7/7/2025 अशी श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणार असून दरम्यानचे काळात सोमवार दि.23 /6,/2025 रोजी साधू संतांचे विचारांनी प्रेरित झालेले व ^ जे का रंजले गांजले. तयांशी म्हणे जो आपूले साधू तोची ओळखावा.देव तेथेची जानावा^ या उक्ती प्रमाणे आचरण करीत असलेले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे यांनी सालाबाद प्रमाणे या ही वर्षी आपले राहुरी फॅक्टरी येथील ^कृष्णा^ या निवांस्थाणी सदरचे या पायी दिंडी सोहळ्याचे मनोभावे सपत्नीक असे महाप्रसादाचे माध्येमातून स्वागत करून पंढरीच्या विठुराया चरणी संपुर्ण वारकरी जनसमुदायाच्या साक्षीने आपली सेवा समर्पित करून मनोभावे पूजा केली.
या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाचा परिसरातील भाविकानी या दिंडी सोहळ्याचा आनंद घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती मा.शिक्षक ज्ञानेश्वर बनसोडे व उभयतांनी केली आसल्यामुळे विठुराया चरणी प्रचंड जनसमुदाय नतमस्तक झाला होता.
सदरचे या दिंडी सोहळ्याचे आयोजक ह. भ. प. निवृती महाराज आळंदीकर व त्यांचे इतर सहकारी यांचे मार्गदर्शनाखाली व पंढरीच्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने व ह. भ . प .निवृत्ती महाराज यांचे मार्मिक प्रवचनाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे..
.
.