सामाजिक
हिमांशु पाटील यांची युवा संसदेत केंद्रीयमंत्री म्हणून निवड
अमरावती / प्रतिनिधी
नेहरू युवा केंद्र व युनिसेफ (क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकार) द्वारा आयोजित राज्यस्तरीय अभिरूप युवा संसदेत ३६ जिल्ह्यांमधून प्रत्येकी दोन युवा संसद प्रतिनिधी निवडण्यात आले आहेत. यापैकी २४ प्रतिनिधींना युवा संसदेत केंद्रीय मंत्री म्हणून बोलण्याची संधी मिळेल .
अमरावतीचे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे हिमांशु उषा सुनिल पाटील यांची ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री म्हणून निवड करण्यात आली
राज्यस्तरीय अभिरूप युवा संसद दि. १९ व २० नोव्हेंबर २०२३ रोजी आर्थिक राजधानी मुंबई येथे संपन्न होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संसदेत विधानभवन व राजभवनाच्या भेटीसह विविध माध्यमातून युवकांना राजकीय क्षेत्राचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1