13 वर्षाच्या मुलीने असे काय केले की आनंद महिंद्रा झाले तिचे मुरीद
बस्ती ( उत्तरप्रदेश ) / नवप्रहार मीडिया
प्रसंगावधान ठेवत आपण जर संयम बाळगला तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीवरमात करू शकता हे एका 13 वर्षाच्या मुलीने दाखवून दिले आहे.
माकडं म्हटलं की महिलांना घाबरगुंडी सुटते. त्यात किशोरवयीन मुलींची तर गोष्टच वेगळी. घरात कुठलीही मोठी व्यक्ती नसतांना घराच्या आत आलेल्या माकडांनी अक्षरशः उच्छाद मांडलेला असतो. माकडं घरातील भांडी फेकफाक करत असतात.तिथपर्यंत ठीक . पण यापैकी एक माकड तिच्या 15 महिन्याच्या बहिणीकडे जातांना पाहून तिला धडकी भरते. पण प्रसंगवाधान राखत ती मोबाईल मधील अलेक्सा ला कुत्र्यांचा आवाज काढण्याच कमांड देते. आणि त्यामुळे माकडं घरातून पळ काढतात.
सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या आनंद महिंद्रा यांनी शनिवारी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी 13 वर्षांच्या मुलीच्या शौऱ्याची कहाणी सांगितली आहे. या मुलीने प्रसंगावधान राखत तिच्या लहान बहिणीचा जीव वाचवला आहे. निकीता असं या मुलीचं नाव आहे. निकीताच्या या धाडसाचे आनंद महिंद्रा यांनी कौतुक करत त्यांना थेट नोकरीची ऑफर दिली आहे. निकीता ही उत्तर प्रदेशची रहिवाशी आहे.
काय घडलं नेमकं?
उत्तर प्रदेशच्या बस्तीयेथील ही घटना आहे. 13 वर्षांच्या निकिताने अॅलेक्सा डिव्हाइसच्या मदतीने घरातून माकडांना हुसकावून लावले आहे. इतकंच नव्हे तर तिच्या प्रसंगावधानाने तिने 15 महिन्यांच्या बहिणीचे प्राणही वाचवले आहेत. निकिता जेथे राहते त्या भागात माकडांचा उच्छाद आहे. त्यांच्या घरी पाहुण आले होते. मात्र, त्यांच्याकडून चुकून घराचा गेट खुला राहिला. त्यातून काही माकडं घरात घुसली त्यांनी घरातील वस्तु फेकण्यास सुरुवात केली. तिथेच निकिताची लहान बहिण खेळत होती. माकडं बाळाकडे जास असतानाच निकिताने प्रसंगावधान राखत अॅलेक्सा या डिव्हाइसला कमांड करत कुत्र्याचा आवाज प्ले करण्यास सांगितला.
माकडं बाळाकडे जात असताना अॅलेक्सामधून कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला. कुत्र्यांच्या आवाजामुळं माकडं घाबरुन खोलीतून पळाले. मुलीच्या प्रसंगावधानामुळं माकडं खोलीतून पळाले. मुलीने स्वतःबरोबरच आपल्या लहानग्या बहिणीचाही जीव वाचवला आहे. निकीताच्या या धाडसाचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे. अनेकांनी तिच्या मुलाखतीदेखील घेतल्या आहेत. आनंद महिंद्रा यांनीही या मुलीचे कौतुक करत ट्विट करत हा प्रसंग शेअर केला आहे.
आनंद महिंद्रा यांनी या मुलीचे कौतुक करताना म्हटलं आहे की, या युगात आपण तंत्रज्ञानाचे नोकर होणार की मालक हा प्रश्न आहे. पण या मुलीच्या प्रसंगावधानाने तंत्रज्ञान हे नेहमीच मानवी बुद्धीला प्रोत्साहन देणार आहे. तिचे प्रसंगावधान असाधारण आहे. या मुलीमध्ये नेतृत्व गुण आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर जर या मुलीला कॉर्पोरेट क्षेत्रात येण्याचा विचार करत असेल तर आम्ही तिला संधी देऊ इच्छितो. महिंद्रा राईजमध्ये ती आमच्यासोबत काम करु शकते, असं म्हणत महिंद्रा यांनी तिला नोकरीची ऑफर देऊ केली आहे.