क्राइम

पोलिसांनी ठोकले बनावट जिरा कारखान्याला सील  : दोघांना अटक

Spread the love

पालघर / नवप्रहार मीडिया 

                जिऱ्याचा उपयोग स्वयंपाक घरात मसाल्यात होतो. अनेक पेय पदार्थात जिरा वापरल्या जातो. जिरा पाचक असल्याने आयुर्वेदिक औषधापासून ते अनेक ठिकाणी त्याचा उपयोग होतो.जिऱ्याचे भाव मागील काही दिवसात वधारले असल्याने काही लोक याच गोष्टीचा फायदा उचलत बनावटी जिरा निर्मिती करीत होते. पोलिसांनी बनावट जिरा निर्मिती करणाऱ्या कारखान्याला सील ठोकले आहे. या कारखान्याचे भिवंडी ते गुजरात कनेक्शन समोर आले आहे.

रसायने वापरून तयार केल्या जात असलेल्या बनावट जिऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आतापर्यंत बनावट जिऱ्याची किती विक्री झाली आणि किती लोकांच्या आरोग्याशी खेळ झाला, याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.याप्रकरणी चेतन रमेश गांधी (रा. कांदिवली पश्चिम) व शाबाद इस्लाम खान (रा. नवले फाटा, पालघर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पालघर मधील नंडोरे येथील हा बनावट कारखाना उघडकीस आल्यामुळे त्याचे धागेदोरे थेट भिवंडीपासून गुजरातमधील उंजापर्यंत पोहोचले आहेत. हे बनावट जिरे जिरा राईस करण्यासाठी वापरले जाते. मोठ्या हॉटेलमध्ये पॅरोट कंपनीच्या या जिऱ्याचा वापर केला जातो. बाजारात साडेचारशे रुपये किलो दराने विकल्या जात असलेल्या मूळ जिऱ्यापेक्षा हे बनावट जिरे अडीचशे ते तीनशे रुपये किलो इतक्या कमी दराने विकले जात होते. त्यामुळे व्यावसायिकांची या बनावट जिऱ्यांना पसंती होती.

नोव्हेल इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये जागृती इंटरप्राईजेस नावाचा बनावट जिरे निर्मिती कारखाना सुरू करण्यात आला होता. लाकडाचा भूसा व रसायने, बडीसेपाचा काढून टाकलेला टोकाचा भाग बनावट जिरे तयार करण्यासाठी वापरला जात होता. त्यासाठी लागणारा कच्चा माल गुजरातमधील उंजा इथून आणला जात होता.

हॉटेलवर तसेच धाब्यांवर पॅरोट कंपनीच्या या जिऱ्याची मोठ्या प्रमाणात विक्री

ठाणे, नवी मुंबई भिवंडी आदी परिसरातील हॉटेलवर तसेच धाब्यांवर पॅरोट कंपनीच्या या जिऱ्याची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात होती. पोलिस आयुक्त नवनाथ ढवळे, सहायक आयुक्त ईश्वर खैरनार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या पथकाने सापळा रचून नागाव फातमा नगर येथे पिकप टेम्पो जप्त केला. त्यात ८० गोण्यांमध्ये सात लाख २१ हजार सातशे रुपये किमतीचे बनावट जिरे होते.

दरम्यान माजी सरपंच दिनेश कान्हात यांनी नंडोरे ग्रामपंचायतीकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. या कारखान्याचे बांधकाम बेकायदेशीर असून पेसा कायद्यांतर्गत बांधकामासाठी ग्रामसभेची परवानगी आवश्यक असते; परंतु ती घेतली गेली नाही, असे कान्हात यांनी निदर्शनास आणले होते. गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांकडेही त्यांनी तक्रार दाखल केली होती; परंतु दखल न घेतल्यामुळे? नागरिकांच्या जीवनाशी खेळ करणारा हा कारखाना चालू राहिला असा आरोप त्यांनी केला आहे.गिजा कंपनी, चेतन गांधी आणि कांतीलाल जैन यांच्या कंपनी बाबत कान्हात यांनी तक्रार केली होती. या तक्रारींची वेळीच दखल घेतली गेली असती, तर लोकांच्या जीविताशी खेळ करणारी ही कंपनी सुरू होऊ शकली नसती असे कान्हात यांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close