हिंगणघाट मतदार संघा मध्ये लोकसभा निवडणूकीची पुर्वतयारी सुरु
हिंगणघाट / प्रतिनिधी
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता होणा-या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर हिंगणघाट मतदार संघामध्ये पुर्वतयारी सुरु झालेली असुन मा. जिल्हाधिकारी वर्धा यांचे मार्फत आढावा घेणे सुरु आहे.
वर्धा लोकसभा अंतर्गत हिंगणघाट मतदार संघाच्या मतदान झालेल्या मतदान यंत्राची साठवणुक त्याची सुरक्षा व त्या अनुषंगाने तहसिल कार्यालय हिंगणघाट येथे तयार करण्यात आलेल्या सुरक्षाकक्ष व यंत्रणेचा आज मा.उप विभागीय अधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, श्रीमती शिल्पा सोनाले , व मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. रोशन पंडीत यांनी संयुक्तीकरित्या आढावा घेतला. सदर बैठकी दरम्यान तहसिलदार श्री. सतिश मासाळ तसेच पोलीस निरीक्षक हिंगणघाट हे उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणूकीकरीता मा. निवडणुक आयोगाचे निर्देशानुसार विधानसभा स्तरावर होणा-या प्रचार प्रसिध्दी करिता मतदान यंत्रे प्राप्त झाली आहेत. तसेच 2 फिरते प्रात्यक्षिक वाहनाव्दारे मतदार संघामध्ये गावोगावी जाऊन जनतेमध्ये मतदार जनजागृती व मतदान यंत्र हाताळणी कसे करावे या बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता विशेष मोहिम राबवुन प्रचार प्रसिध्दी करण्यात येत आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीसाठी मतदान करणे करिता मतदार यांदीमध्ये नाव नोंदविणे ची मोहिम सुरु असुन अजुनही ज्यांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ नाही त्यांनी जवळच्या मतदान केंद्रावर किंवा तहसिल कार्यालयात जाऊन मतदार नोंदणी करण्याचे आवाहन सोबतच मतदान ओळखपत्रासोबत आधार लिंक करण्याचे आवाहन मा.मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी केलेले आहे.