प्रेमात असलेल्या तरुणीचा तिच्या नकळत काढलेला विवस्त्र व्हिडिओ पॉर्न साईटवर टाकला

पुणे / नवप्रहार ब्युरो
सध्या उच्चशिषित तरुण तरुणी शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या काळात प्रेमात पडतात. काही दिवस एकत्र घालवल्यावर काही कारणास्तव त्यांच्यात वाद होतो. आणि मग ते दूर जातात. पण अशा वेळी इर्षेने पेटलेला तरुण त्याच्या खाजगी क्षणाचे फोटो व्हायरल करत मुलीची बदनामी करतो. पण एका इंजिनिअर तरुणाने तर सर्वच मर्यादा ओलांडल्या. तरुणीने लग्नास नकार देताच त्याने खाजगी क्षणाचे व्हिडिओ पॉर्न साईटवर टाकले. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
24 वर्षीय पीडित तरुणी एका कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत असून, आरोपी विनय शिरीष कुलकर्णी फुलेवाडी, कोल्हापूर) हा अॅटोमोबाईल इंजिनिअर आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्यात मैत्री झाली आणि ती प्रेमात बदलली. परस्पर संमतीने संबंध झाले असताना, विनयने तिच्या नकळत नग्न अवस्थेतील व्हिडीओ चित्रीत केले.
काही कारणांमुळे त्यांचं नातं संपुष्टात आलं आणि पीडित तरुणीने विनयला लग्नासाठी नकार दिला. त्यानंतर काही महिन्यांनी तिच्या मैत्रिणीने पोर्न साईटवर पीडितेचा व्हिडीओ पाहून तिला याबाबत माहिती दिली. यानंतर पीडितेने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हा प्रकार ३० डिसेंबर २०२३ ते १२ मे २०२५ या कालावधीत घडला असल्याची माहिती आहे. पोलिसांनी विनय कुलकर्णी याच्यावर आयटी अॅक्टसह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
ही घटना केवळ सायबर गुन्ह्याचं उदाहरण नाही, तर नात्याच्या नावाखाली झालेला विश्वासघात देखील आहे. पोलिसांकडून आरोपीला लवकरच अटक होण्याची शक्यता असून, याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे.