प्रेमात बळजबरी , शारीरिक संबंध , गर्भवती राहिल्यावर रबडीतून औषध देत गर्भपात

प्रेयसीची पोलिसात तक्रार
पिंपरी- चिंचवड / नवप्रहार ब्युरो
मागील सात – आठ वर्षापासून प्रेमसंबंध असलेल्या आणि कधी लग्नाचे आमिष तर कधी बळजबरी करत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या. प्रेयसी गर्भवती झाल्यावर तिने लग्नाबद्दल विचारल्यावर नकार देणाऱ्या प्रियकरा विरोधात पोलिसात तक्रार केली आहे.
याप्रकरणी आरोपी प्रियकर आदर्श वाल्मीक मेश्राम याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार आणि गर्भपाता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२८ वर्षीय पीडित तरुणी आणि आरोपी आदर्श वाल्मीक मेश्राम यांचं २०१८ पासून प्रेम प्रकरण सुरू होतं. पीडित इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे. आरोपी हा इंजिनियर आहे.
महाविद्यालयीन काळापासून पीडित २८ वर्षीय तरुणी आणि २८ वर्षीय आरोपी आदर्श वाल्मीक मेश्राम यांच्यात प्रेम संबंध होते. आदर्श नेहमीच पीडीतेला लग्नाच आमिष दाखवून वारंवार इच्छेच्या विरोधात शारीरिक संबंध ठेवत असायचा. अनेकदा पीडित तरुणीने लग्न कधी करायचं असं विचारल्यानंतर तो वेळ मारून न्यायचा. आरोपी आदर्श वाल्मीक मेश्राम याचे इतरही मुलींसोबत रिलेशनशिप असल्याचं पोलीस तक्रारीत पीडितेने म्हटलं आहे. २०२४ मध्ये लग्नाच्या आमिष दाखवून पीडीतेसोबत हिंजवडीतच हॉटेल वोयोमध्ये लैंगिक अत्याचार केले. तसेच शारीरिक संबंधास नकार दिल्यानंतर पिडीतेला मारहाण देखील करण्यात आली आहे. २३ जून २०२५ रोजी आदर्श चा वाढदिवस असल्याने पीडित पुण्यात आली होती. तेव्हा आदर्शचा मोबाईल पाहिल्यानंतर त्याचे इतर मुलींसोबत संबंध असल्याचं पीडितेला समजलं होतं.
याच दरम्यान वारंवार शारीरिक संबंध आल्याने पीडित गर्भवती राहिली होती. परंतु, हे मूल आदर्शला नको होतं. अखेर पीडितीने थेट लग्नाबाबत विचारल्यानंतर आदर्शने लग्न करण्यास नकार दिला. ३ जुलै २०२५ रोजी आदर्शने पीडित तरुणीला आवडता पदार्थ असलेल्या रबडीमधून नकळत गर्भपाताच्या गोळ्या दिल्या आणि पीडित तरुणीचा गर्भपात केला. या सगळ्या आजारातून पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यास या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात आदर्श वाल्मीक मेश्राम याच्या विरोधात लैंगिक अत्याचार आणि गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणी आरोपीला अटक नाही. अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.