हटके

गर्भवती असतांना आईने खाल्ले असे काही की मुलाला जडला हा आजार ? 

Spread the love

दिल्ली  / नवप्रहार डेस्क               

              असे काही आजार आहेत की जे हजरो, लाखो लोकांतून एखादं दुसऱ्या व्यक्तीला होतात. पण बाळाला असा दुर्मिळ आजार झाला तर महिलांच्या मनात नको ते विचार येतात. एका मुलाच्या अंगावर लहानपणा पासूनच भयंकर केस असल्याने शेजारी आणि नातलगात त्याची चर्चा होते. मुलाच्या या आजाराबद्दल चर्चा झाली की तिचे आई सांगते की तीने मुलगा गर्भात असतांना ही गोष्ट खाल्ली होती. त्यामुळे असे झाले. मात्र वास्तविकता वेगळीच आहे.

पण काही वेळा मुलांना जन्मतः काही आजार असल्याचं कळतं. असाच आजार एका मुलाला झाला आहे, या मुलाच्या शरीरावर खूप केस आहेत. हा लहानग्या मुलाचे फोटो पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. या मुलाला कोणता आजार झालाय आणि त्याच्या आईचं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊयात.

व्हायरल होत असलेले हे प्रकरण फिलिपिन्समधील अपायाओ इथलं आहे. इथं राहणारा एल्मा नावाच्या महिलेचा मुलगा जॅरेन गॅमॉनगन एका विचित्र आजाराने ग्रस्त आहे, ज्याला हायपरट्रिकोसिस असं म्हटलं जातं. हा आजार झाला की शरीरावर केस वाढतात. मात्र, महिलेने आपल्या मुलाला पाहिल्यानंतर विचित्र कारण सांगितलं. महिलेला वाटतं की हे तिच्या मुलासोबत घडलं कारण ती गरोदर असताना तिने मांजर खाल्ली होती, त्यामुळे मुलाला शाप मिळाला आहे.

मुलाला हा आजार का झाला?

‘डेली मेल न्यूज’ वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, महिलेने आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर पाहिलं आणि तिच्या मनात अंधश्रद्धा आली. गरोदरपणात मांजर खाल्ल्यामुळे मुलाला शाप लागला असं ती म्हणू लागली. ही महिला जिथे राहते तिथे मांजरीपासून एक खास डिश बनवली जाते. जेव्हा ती गरोदर होती तेव्हा तिला जंगली मांजरी खाण्याची तीव्र इच्छा झाली होती आणि तिने ती खाल्ली होती, असं महिलेने सांगितलं.

खरं तर, फक्त एल्माच नाही तर तिच्या संपूर्ण गावाला असं वाटतंय. पण ती तिच्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेली तेव्हा त्यांनी एल्माला या आजाराबद्दल सर्व माहिती दिली. या आजाराने ग्रस्त रुग्णाच्या केवळ डोक्यावरच नाही तर चेहरा, पाठ, हात, छाती या अवयवांवरही केस वाढतात, असं म्हटलं जातं. हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. मात्र, या आजारामुळे हे बालक जगातील सर्वाधिक केस असलेला मुलगा म्हणून ओळखला जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close