हटके

प्रसन्ना शंकर यांच्यावर पत्नीचे गंभीर आरोप

Spread the love

तिला विवस्त्र पाहण्यासाठी मुलाच्या बाथरूम मध्ये कॅमेरे लावल्याचा आरोप

 प्रसिद्ध स्टार्टअप Ripplematch चे सहसंस्थापक प्रसन्ना शंकर यांच्यावर त्यांच्या पत्नी दिव्या यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप करत धक्कादायक माहिती समोर आणली आहे.

वॉय्युरिझमपासून जबरदस्तीच्या शारीरिक संबंधांपर्यंत अनेक प्रकरणांचा समावेश असलेल्या या वादाने तणाव वाढवला आहे. प्रसन्ना यांनी मात्र या सगळ्या आरोपांना खोडून काढले आहे.

दिव्या यांनी ‘San Francisco Standard’ ला दिलेल्या मुलाखतीत दावा केला की, प्रसन्ना यांनी तिच्यावर बाळंतपणानंतर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला होता. दिव्याच्या मते, नकार दिल्यास प्रसन्ना धमकी देत होते की, ते दुसऱ्या महिलेकडे जातील. इतकेच नाही, तर ओपन मॅरेजसाठीही सतत दबाव टाकत होते.

दिव्या यांनी सांगितले की, प्रसन्ना यांना शरीरसंबंध ही एक मूलभूत गरज वाटायची. या मानसिकतेमुळे त्यांनी अनेक वेळा गैरवर्तन केले. त्यांच्याशी वाद वाढल्यानंतरही त्यांनी स्वतःला योग्य ठरवत, दिव्याला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला. दिव्याच्या मते, या सर्व गोष्टीमुळे तिच्यावर मानसिक आणि भावनिक ताण वाढला.

दिव्या यांनी अत्यंत गंभीर आरोप करत सांगितले की, प्रसन्ना यांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये, तसेच आपल्या मुलाच्या बाथरुममध्ये गुप्त कॅमेरे लावले होते. त्या कॅमेर्‍यांचा वापर केवळ तिला नग्नावस्थेत पाहण्यासाठी केला जात होता.

त्यांच्यावर वॉय्युरिझमचा म्हणजेच इतरांना नग्न पाहून लैंगिक सुख मिळवण्याचा नाद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणामुळे तिचा सुरक्षिततेवरचा विश्वास उडाला असल्याचेही दिव्याने नमूद केले. दरम्यान, प्रसन्ना शंकर यांनी हे आरोप सरासरी खोटे असल्याचं म्हटलं असून, आपली बाजू मांडण्याची संधीही माध्यमांनी दिली नाही असा दावा त्यांनी केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close