वाय डी व्ही डी महाविद्यालय तिवसा येथे समता पर्व-२०२३ अंतर्गत प्रज्ञा शोध परीक्षा देवुन केले महामानवांना अभिवादन
तिवसा- (दि. ११ एप्रील, २०२३)- स्थानिक
वाय डी व्ही डी कला व वाणिज्य महाविद्यालय तिवसा जि अमरावती येथे महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा आणि आय. क्यु. ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने दि १० एप्रील ते १४ एप्रील २०२३ ‘समता पर्व-२०२३’ अंतर्गत शिक्षणमहर्षी भाऊसाहेब देशमुख यांचा स्मृती दिन, क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती व विश्वत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त
मा. प्राचार्य डॅा एच आर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ११ एप्रील २०२३, मंगळवार रोजी दुपारी १२.०० वा. प्रज्ञाशोध परिक्षेचे आयोजन केले होते यामध्ये वरील तिनही महापुरुषांच्या जीवन व कार्यावर आधारित वस्तुनिष्ठ स्वरुपाचे ५०प्रश्न होते. त्याला पर्याय होते योग्य उत्तर निवडुन पेपर सोडवायचा होता. यामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील एकूण १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याला प्रमाणपत्र व रोख रक्कम अनुक्रमे ५००₹, ३००₹ व २००₹ बक्षीस दिल्या जाईल. महापुरुषांच्या जीवन कार्याचा परियच विद्यार्थ्यांना व्हावा जेणेकरुन जीवनात त्यांना महापुरुषांचे विचार उर्जा देतील असे प्रतिपादन प्राचार्य डॅा एच आर देशमुख यांनी केले.
याप्रसंगी आय क्यु ए सी समन्वयक डॅा शाम गेडाम, डॅा सी जी सोळंके, वाणिज्य विभागप्रमुख
प्रा राहुल माहुरे, डॅा कुसुमेंद्र सोनटक्के, प्रा रविंद्र पाटील, प्रा विनोद खडसे, प्रा सुरज वानखडे,
प्रा एस बी भालेकर, प्रा एन एस मासोदकर,
प्रा डि आर राऊत, सचिन काळे उपस्थीत होते.