उपासना शक्तीने आत्मबल वाढवा, धर्म रक्षण हि काळाची गरज! ह.भ.प. चारुदत्त आफळे.
कीर्तन पुष्प २
कीर्तन महोत्सव आयोजन समित्ती यवतमाळ द्वारा आयोजित भव्य कीर्तन महोत्सव वर्ष १७ वे
यवतमाळ (का.प्र.)
फुटीर प्रवृती वाढत आहे. जाती धर्मा मध्ये तेढ निर्माण करून द्वेश भावनेने सीमा गाठली आहे. हे स्वदेश स्वधर्मासाठी अत्यंत घातक असून माणूस माणसापासून दुर जात आहे. हे वेळीच ओळखा! जागे व्हा ! “उपासना शक्तीने आत्मबल वाढवा, धर्म रक्षण हिच काळाची गरज आहे, असे आवाहन ह. भ. प. चारूदत्त महाराज पुणे यांनी केले. कीर्तन महोत्सव आयोजन समिती द्वारा आयोजित शिवाजी नगर स्थित मैदानावर १७ व्या कीर्तन महोत्सवातील द्वितीय कीर्तनपुष्प गुंफताना ते बोलत होते. भस्म उटी रुंड माळा । हाती त्रिशुल नेत्री ज्वाळा ।। संतश्रेष्ठ नरहरी सोनार यांच्या अभंगाचे निरुपण करताना त्यांनी शास्त्रा सोबतच शस्त्राची उपयोगीता विषद केली. या प्रसंगी त्यांचे स्वागत अरविंद तायडे यांनी केले. केवळ शिवभक्त असणार्या नरहरी सोनारांना स्वत: पांडुरंगानी दृष्टांत दिला. हरिहर एकच आहे याची प्रचिती अनुभवली शाशंकमन स्वच्छ, शुद्ध झाले धर्म रक्षणार्थ हरिने चक्रधारण केले तद्वतच हरांनी हाती त्रिशुळ धारण केले. जेथे साम दाम उपयोगी पडत नाही तेथे दंड धारण करा असा संदेश संतांनी सुद्धा दिला. स्वदेव, स्वदेश, स्वधर्म रक्षणासाठी शस्त्र धारण करणार्याची निंदा ऐतिहासीक महापुरुष व संतांनी कधीही केली नाही असे दृष्टांत, अभंगाद्वारे अत्यंत प्रभावीपणे सादर करताना भगवान श्रीरामचंद्रांचे लोचने मुख, कर आणि पाय कमलासम असून सुद्धा खरदुषणाच्या निर्दालनासाठी अजानु भुज शर चाप धर संग्राम जित खर दूषणं’ असा संत तुलसीदासांचा अभंग अत्यंत प्रभावीपणे सादर करून त्यांनी आपल्या कीर्तनाचा पूर्वरंग सादर केला.
उत्तरार्धात आख्यान सादर करताना द्युत खेळात आपले, राज्य किंबहुना द्रौपदीला डावावर लावून १२ वर्ष वनवास व एक वर्ष अज्ञातवासाची शिक्षा भोगणार्या पांडवांना अरण्यात भगवान श्रीकृष्णांनी जो उपदेश केला…: द्युतजुगार जे राज्य तुम्ही हरले इतकेच नव्हे तर – स्वपत्नी द्रौपदीला वस्तु समजून डावावर लावणे हे नीतिधर्माच्या कसे विरुद्ध आहे. तसेच कपटी कौरव तुम्ही वनवास भोगल्या नंतर तुमचे राज्य परत करणार नाही हे सत्य आहे. तेंव्हा युद्धाची योजना आखा भगवान शिवाची उपासना करून जे शत्रुलाही धैर्यहिन करणारे पाशुपत अस्त्र प्राप्त करा असा उपदेश केला. जे धैयाने शस्त्र धारण करतात, जे स्वतः धडपडतात त्यांनाच भगवंत मदत करतो प्रयत्नाशिवाय यश हे भगवंतांना मान्य नाही. सज्जनावर शक्ती चालविण्याची सक्ती करु नका पण दुष्टांना दहशत राहावी या साठी तरी शस्त्र आवश्यक आहेच असे आवाहन करून त्यांनी आपल्या कीर्तनाची सांगता केली. संवादीनीवर गंगाधरराव देव- तथा सबल्यावर सचिन वालगंजे, सौरभ देवधर यांनी कीर्तनान रंग भरला. दिप प्रज्वलन तथा आरती चे यजमानपद अरुण बिडकर, महेश जोशी, सदानंद देशपांडे, सांबजवार, जयंत तोताडे, राजेन्द्र डांगे, सुरेश वैâपिल्यवार यानी भूषविले अरुंधती भिसे यांनी देवर्षी नारद आरतीचे गायन केले. कार्यक्रमाचे सर्वांग सुंदर सूत्र संचालन मधुरा वेळूकर यांनी केले.
धन्यवाद!