जीवन प्राधिकरणाची थकीत वसुलीची विशेष मोहीम
विशेष वसुली पथक करणार थेट कारवाई.
अरविंद वानखडे
यवतमाळ –महाराष्ट्र जीवन प्राधिकरण थकीत बिल वसुलीची धडक बसली कारवाई केल्या जाण्याची माहिती देण्यात आली.
अनेक ग्राहकांचे थकीत बिल बाकी असून थकीत ग्राहकांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा कार्यकारी अभियंता यांनी दिला आहे.
यवतमाळ शहरातील नगरपरिषद क्षेत्रामधील विलीन करण्यात आलेल्या अनेक ग्रामपंचायतीसह शहरातील अनेक भागातील ग्राहकांकडे जीवन प्राधिकरणाची कोट्यावधी रुपये बाकी आहे.या वर्षी बिलाच्या वसुली करता विशेष मोहीम राबविल्या जात असून हे बिले तात्काळ न भरल्यास ग्राहकांचा पाणीपुरवठ्याची नळ पाईपलाईन बंद करण्यात येणार याकरिता पाणीपुरवठा विभागाने विशेष वसुली पथक निर्माण करून ग्राहकांकडे पाणीपट्टी थकीत बिल वसुली करण्याकरिता प्रत्यक्ष घरापर्यंत जाऊन ही वसुली केल्या जाणार असून बिल वसुलीत तात्काळ कनेक्शन बंद केल्या जाणार आहे.
या वसुली पथकांना ग्राहकांनी सहकार्य करून आपल्याकडे असलेली थकीत बिल तात्काळ भरावी व ग्राहकांना हा नाहक त्रास होणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी बिलाची रक्कम न भरल्याने या रकमेमध्ये ग्राहकांना अतिरिक्त रक्कम भरण्याची वेळ येत आहे. तरी ग्राहकांनी अशी परिस्थिती निर्माण होण्याकरिता नेहमी पाणीपुरवठा विभागातला सहकार्य करून ही बिले तात्काळ भरावी.
देवकांचा भरणे करण्याकरिता शहरांमध्ये अनेक ठिकाणी सुलभ व्यवस्था करण्यात आली असून pदर्डा नगर, वाघापूर नका, वडगाव रोड नाका, पिंपळगाव तसेच पाणीपुरवठा विभागात मुख्य कार्यालय येथे ग्राहकांकडून प्राप्त केले जाते. असे आवाहन कार्यकारी अभियंता प्रफुल व्यवहारे यांनी वसुली पथका समवेत केली.0