क्राइम

वरच्या खोलीत सुरू होता वेश्याव्यवसाय , पोलिसांना मिळाली खबर अन… 

Spread the love

सोलापूर / पंढरपूर – प्रतिनिधी

                सध्या विना कष्टाचा पैसा कसा कमावता येईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. अल्पावधीत रग्गड पैसा कमविण्याच्या लालसेपायी अनेक लोक वाममार्गाचा उपयोग करतात. असाच प्रकार  दोन महिलांनी केला . पण ही बाब पोलिसांना कळल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

 लक्ष्मीटाकळी (ता. पंढरपूर) येथे एका खोलीत देहविक्री केल्याप्रकरणी पिडीत दोन महिलांची सुटका करुन दोन महिलांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, दोन महिलांनी घरांच्या वरील खाेलीत स्वत:च्या आर्थिक फायद्या करता, वेश्यागृह केले होते. वेश्याव्यवसाय करुन त्या कमाईवर उदरनिर्वाह करत होत्या. याबाबत पोनि. टि. वाय. मुजावर यांना माहीती मिळाली, त्यांनी तत्काळ पोकॉ सुधाकर हेंबाडे यांना संबंधित ठिकाणी पाठविले. यावेळी वेश्यागृह चालविणाऱ्या दोन महिलांकडून पिडीत दोन महिलांची सुटका करण्यात आली. तसेच संबंधित दोन स्त्रीयांविरुध्द पंढरपूर तालुका पाेलीस ठाण्यात पोकॉ सुधाकर हेंबाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close