क्राइम

गोळीबाराच्या घटनेत भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नी ठार

Spread the love

गोळीबाराचा आवाज ऐकून ती घराबाहेर पडली आणि प्राणास मुकली

चंद्रपूर / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

           अचानक गोळीबाराचा आवाज कानावर पडल्याने नेमके काय घडले आहे हे पाहण्यास घराबाहेर पडलेल्या महिलेच्या छातीत गोळी लागल्याने ती गतप्राण झाली. पूर्वशा सचिन डोहे असे त्या महिलेचे नाव आहे. घटना रात्री 9.30 वा चे सुमारास सोमनाथ पुरा येथे घडली.यावेळी त्याचे पती भाजपा पदाधिकारी सचिन डोहे हे घराबाहेर होते. मुख्य म्हणजे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लल्ली शेरविल याच्यावर हा गोळीबार करण्यात आला होता.पण शेरविल हा डोहे यांच्या घरी आश्रयास आला आणि गोळीबाराचा आवाज ऐकून पूर्वशा नेमके काय होत आहे ? हे पाहण्यासाठी घराबाहेर पडल्या आणि हा अनर्थ घडला. 

जखमी लल्ली शेरवील आणि भाजयुमोचा पदाधिकारी सचिन डोहे शेजारी आहेत. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास लल्ली शेरवीलवर त्याच्या घरी एका मारेकऱ्याने गोळीबार करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र शेरवील हा जीव वाचवित कसाबसा पळून शेजारी सचिन डोहे यांचे घरी आश्रयास गेला. पळून जात असताना मारेकऱ्याने त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबार होत असल्याने सचिन डोहे यांची पत्नी ही घराबाहेर आली. शेरवीलवर झाडलेली गोळी थेट सचिन डोह यांची पत्नी पूर्वशा डोहे हिच्या छातीवर लागली आणि ती जागीच ठार झाली.

यावेळी तिचा पती सचिन हा घरी नव्हता. त्यानंतर चालविलल्या गोळीबारात शेरवील हा जखमी झाला आहे. जखमीला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेनंतर मारेकरी हा पळून जाण्यात यशस्वी झाला. मारेकरी का एकटाच असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती राजूरा पोलिसाना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येत चोख पोलिस बंदोबस्त लावला. पसार झालेल्या आरोपीचा राजूरा पोलिस शेाध घेत आहेत. शेरवील याचा कोळसा तस्करीशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. कोळसा तस्करीच्या व्यवहारातून शेरवील याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात शेरवील शेजाऱ्या घरी घुसल्याने डोहे यांच्या पत्नीवर गोळी झाडून ठार झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close