सामाजिक

पी एम श्री केंद्रीय विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा.

Spread the love

नांदेड / प्रतिनिधी
पी एम श्री केंद्रीय विद्यालय केंद्रिय राखीव पोलिस बल प्रशिक्षण महाविदयालय सी. आर पी एफ मुदखेड जिल्हा येथे अंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. यावर्षीची थीम होती “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग “.
कार्यक्रमाची सुरुवात योग प्रशिक्षक श्रीरोहन गायकवाड़ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारना याद्वारे करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ताडासन, वज्रासन, भुजंगासन, अनुलोम-विलोम आणि कपालभाती सारखी अनेक आसने अतिशय मन लावून केली.
यानंतर प्राचार्य अजय चौकीकर यांनी विचार व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यार्थ्यांनी योगावर आधारित मनोगत सांगीतले.
या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीसह .पालकही उत्स्फूर्तपणे सहभागी होते .
कार्यक्रमाचा समारोप शांतीपाठ व राष्ट्रगीतने करण्यात आला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close