रामटेक कीनवट बस नियमीत येत नसल्याने प्रवाशांचे हाल

घाटंजी ता प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
घाटंजी तालुक्याच्या अती दुर्गम भागातील गेल्या पन्नास वर्षापासुन सुरू असलेली रामटेक आगारातील रामटेक किनवट बस गत दोन दिवसापासुन येत नसल्याने नागपूर रामटेक येथे जाणारे प्रवाशांचे हाल होत असून किनवट व उनकेश्वर सायफळ येथिल बसस्थानकावर प्रवाशास तासनं तास ताटकळ बसावे लागत आहे. सदर रामटेक किनवट बस हि गेल्या पन्नास वर्षापासुन सुरू असून गत काही दिवसापासुन अनियमीत येत असल्याने प्रवाशांना, शाळकरी विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव खाजगी वाहनाने जादा पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे नुकसान होत आहे घाटंजी व किनवट तालुक्यातील सीमावर्ती भागातून सकाळ सत्रात पांढरकवडा नागपूर रामटेक जाण्यासाठी हि एकमेव बस असल्याने प्रवाशी सकाळीच या बसची वाट पाहत असतात मात्र गेल्या दोन दिवसापासुन बस येत नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे.याकडे लोकप्रतिनीधी लक्ष घालावे अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.
०००००००००००००००००००००
संग्रहीत छायाचित्र.