घाटंजी पंचायत समिती येथे ४० वर्ष सेवा देणारे परिचर गुल्हाणे सेवानिवृत्त.
घाटंजी तालुका प्रतिनिधी – सचिन कर्णेवार
सविस्तर वृत्त-कुठल्याही शासकिय क्षेत्रात कार्य करत असताना तो कार्यकाल त्याच ठिकाणी किती काळ टिकेल हे सांगता येत नाही.कधी वरुन बदली होते तर कधी वरिष्ठ अधिका-याशि न जुळल्याणी बदली होते हे उघड सत्य असताना यास घाटंजी येथिल वसंत नगर रहिवासी विनायक दिवाकर गुल्हाणे मात्र अपवाद ठरले असल्याचे दिसते. घाटंजी पंचायत समिती येथे रुजू झाल्यापासून तर चक्क निवृत्ती होईपर्यंत गेली ४० वर्ष गुल्हाणे यांनी घाटंजीतचं परिचर म्हणून कर्तव्य बजावले. विशेष बाब म्हणजे विनायकजीचा निवृत्त दिन व त्यांचा ६० वा वाढदिवस एकत्रितपणे आल्याणी तो पंचायत समिती येथे साजरा करण्यात आला. आपल्या सेवा काळात त्यांनी अनेक बि.डी.ओ, अधिकारी यांच्याशि जळून घेत उत्तम सेवा दिली त्याबद्दल निवृती व वाढदिवस दीन दोन्ही ही तेली महासंघ,ओबीसी जनमोर्चा तालुका संघटना,शिंपी समाज संघटना घाटंजी यांच्या वतीने साजरा करण्यात या प्रसंगी विनायकराव गुल्हाणे व त्यांच्या पत्नी सौ.सुनिता वि गुल्हाणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम प्रसंगी शंकरराव लाकडे सर,गावंडे सर,धनंजय गुल्हाणे, विलास कठाणे,विठ्ठल पारखे,प्रशांत नित तेली महासंघ शहर अध्यक्ष,विजु बोंदरे,गोलूभाऊ फूसे,सूनिल बूटले,ढोले सर, राजेंद्र गोबाडे सर तेली महासंघ तालुका सचिव, ओबीसी जनमोर्चा संघटना तालुका सचिव सचिन कर्णेवार तथा इतरही पदाधिकारी उपस्थित होते.