त्या… विद्यार्थ्याला न्याय द्या! अन्यथा आंदोलन करू वंचित आघाडीचे निवेदन
मुख्याध्यापिकेसह संचालक मंडळवार गुन्हे दाखल करा
शमीम आकबानी
लाखनी | सामेवाडा येथील रवींद्र मेश्राम यांचे दोन मुलं तेजस मेश्राम, स्वानंद मेश्राम हे एआयएम पब्लिक स्कुल मानेगाव येथे सण २०१८-१९ या शैक्षनिक वर्षात शिक्षण घेत होते. दरम्यान, कोरोना काळात पालकांच्या व्यवसायात बाधा निर्माण झाल्यामुळे मुलांची शैक्षनिक शुल्काचा भरणा केला नाही.
परिस्थिती हलाकीची असल्याने पुढील शिक्षणासाठी एआयएम पब्लिक स्कुल मधून टी.सी.काढण्याचा निर्णय घेतला.परंतु शाळेतील मुख्यध्यापिका यांनी आधी फी जमा करा तरच टी.सी.मिळेल असा तगादा लावला होता अशी माहिती पत्र परिषदेत पालकांनी दिली.
शिक्षण हक्क कायद्यानुसार ६ते १४वयोगटातील बालकांना शिक्षणाचा हक्क आहे. मुख्यध्यापिका यांनी फी साठी तगादा लावल्यामुळे स्वानंद याला मागील तीन वर्षांपासून शिक्षनापासून वंचित राहावे लागले.शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे स्वानंद नेहमीच तणावात राहत असतो. तर, वडील रवींद्र मेश्राम यांनी शाळेकडे वारंवार विनंती केली होती,मात्र टी.सी.मिळाली नाही.
सदर विद्यार्थ्याला शिक्षनापासून वंचित ठेवण्यात आले.त्याचे शैक्षणिक नुकसान झाले.याला जवाबदार कोण? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष श्रीकांत नागदेवे यांनी उपस्थित केला आहे.
विद्यार्थ्याला शिक्षणापासून दूर ठेवण्याचे कटकारस्थान एआयएम पब्लिक स्कुलतर्फे करण्यात आले असून, मुख्यध्यापिकासह संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष श्रीकांत नागदेवे यांनी लेखी निवेदनातून केली आहे. सदर विद्यार्थ्यास तीन दिवसाच्या आत टी.सी.मिळून न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा श्रीकांत नागदेवे यांनी निवेदनातून दिला आहे.
जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाच्या कायम विनाअनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या शाळांचे पेव फुटले असून या शाळांचा दिखाऊपणाला आहारी जाऊन पालक या शाळेत पाल्यांना शिकवितात. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असले तरी या शाळांकरून अवाजवी फिस आकारून पालकांची आर्थिक लूट केली जाते.
गटशिक्षणाधिकारी अर्थकारणामुळे शासनाने नेमून दिलेली कामे प्रामाणिकपणे न बजावता कर्तव्यात कसूर करीत असल्याने स्वानंद मेश्राम ह्या विद्यार्थ्यावर शाळाबाह्य होण्याची वेळ आली. शिक्षकांना पद मान्यता,संच मान्यता व फिस निर्धारण समिती गठीत केली नसेल तर या शाळेस विद्यार्थ्यांकरून फिस घेण्याचा अधिकारी नाही.
प्रवीण उदापुरे
शिक्षा बचाव आंदोलन प्रमुख
माझ्याकडे पालकांनी टी.सी.मिळाली नसल्याचा अर्ज दि.२८ ऑगस्ट रोजी दिला असून, प्राप्त अर्जा नुसार या कार्यालयामार्फत संबंधित शाळेला पत्र निर्गमित करण्यात आले. पालकांकडून आमच्या कार्यालयात मागील तीन वर्षात कुठलीही लेखी तक्रार प्राप्त झाली नाही. त्यामुळे कारवाई करता आली नाही. लाखनी तालुक्यातील एकही शाळा अनधिकृत नाही.सर्व शाळा अधिकृत आहेत.
सुभाष बावनकुळे
गटशिक्षणाधिकारी,प.स.लाखनी