वाचा बायकोने नवऱ्याला हॉटेल च्या रूम मध्ये चपलेने का धुतले
वाचा बायकोने नवऱ्याला हॉटेल च्या रूम मध्ये चपलेने का धुतले
आग्रा (युपी) / नवप्रहार मीडिया नेटवर्क
याला पाश्चात्य संस्कृतिचा असा म्हणावा किंवा टीव्ही सिरीयल किंवा चित्रपटात दाखविण्यात येणाऱ्या लफडयांचा अथवा सोशल मीडियावर सहज उपलब्ध होणाऱ्या तसल्या चित्रफितीचा . मागील काही काळात तरुण- तरुणींच्या लफडयात तर सोडा बुवाहित महिला आणि पुरुषांच्या विवाहबाह्य संबंधात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आणि यामुळे पती पत्नीच्या नात्यात दरी वाढत असल्याने घटस्फोटाचे प्रमाण देखील वाढत आहे. या बाबीमुळे नात्यात दुरावा निर्माण होत असला आणि त्याच्या परिणाम मुलांच्या भविष्यावर पडत असला तरी त्याची तमा महिला काय आणि पुरुष काय कोणीही बाळगत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधाचे प्रकरण समजल्यावर त्याच्यावर पळत ठेऊन असलेल्या बायकोने त्याला त्याच्या प्रेयसी सोबत हॉटेल च्या रुम मध्ये रंगेहाथ पकडले आणि त्याची व तिची तेथेच चपलेने धुलाई सुरु केली. या प्रकरणाचा तिने व्हिडीओ देखील बनवलंआ आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी अफलातून प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
पत्नीच्या नकळत तो एका महिलेला डेट करत होता. पण हुशार बायकोनं हॉटेलच्या रूममध्ये त्याला रंगेहात पकडलं. अन् मग काय, चक्क चपलेने त्याची धुलाई केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
ही घटना आग्रामधील एका हॉटेलमध्ये घडली. एक व्यक्ती बायकोच्या नकळत एका महिलेला डेट करत होता. तिला घेऊन तो हॉटेलच्या रूममध्ये गेला होता. पण बायकोने त्याचा पाठलाग करून त्याला रंगहात पकडलं. बायकोला पाहताच त्याचा चेहरा पांढरा पडला. तो हात जोडून माफी मागू लागला. पण बायको काही ऐकण्याच्या मानसितेमध्ये नव्हती. तिने आपल्या नवऱ्याला चपलेनं मारहाण केली. शिवाय या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर देखील शेअर केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील भडकले आहेत. त्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत.