राजकिय

पिरीपाचे जिल्ह्यातील विधानसभा प्रभारी घोषित

Spread the love

चांदुर रेल्वे (ता.प्र. ) प्रकाश रंगारी

चांदुर रेल्वे : पीपल रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हा राजकीय व्यवहार कार्य समितीची महत्त्वपूर्ण बैठक 11 जुलै 2024 गुरुवार रोजी शताब्दी भवन उत्तम नगर अमरावती येथे घेण्यात आली.
पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष विलास पंचम भाई यांच्या उपस्थित तथा पश्चिम विदर्भा अध्यक्ष व जिल्हा राजकीय व्यवहार कार्य समितीचे अध्यक्ष प्रा. डी. के. वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीमध्ये विधानसभा निवडणूक पूर्वतयारीच्या दृष्टीने व जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्याच्या संदर्भाने सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील विधानसभा निहाय प्रभारी व सह प्रभारीच्या नियुक्ती घोषित केल्या आहे.

*विधानसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात*
विधानसभा प्रभारी नियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये दर्यापूर विधानसभा प्रभारी बी. डी. गजभिये सह प्रभारी रामेश्वर इंगळे, अचलपूर विधानसभा प्रभारी भास्कर वराडकर सह प्रभारी प्रमोद नितनवरे, मेळघाट विधानसभा प्रभारी श्रीकृष्ण पळसपगार सह प्रभारी अरुण तंतरपाळे, वरुड मोर्शी विधानसभा प्रभारी मधुसूदन दुपारे सह प्रभारी सुमित वानखडे, तिवसा विधानसभा प्रभारी गंगाधर खडसे सह प्रभारी प्रमोद मोरे, धामणगाव रेल्वे विधानसभा प्रभारी प्रकाश रंगारी सह प्रभारी महादेव थोरात, अमरावती विधानसभा प्रभारी वासुदेव सामटकर सह प्रभारी बाळासाहेब इंगोले, बडनेरा विधानसभा प्रभारी सुरेश बहादुरे सह प्रभारी अशोक गुजर यांचा समावेश आहे. अशी माहिती पीपल रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष दाजी इंगोले यांनी दिली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close