विदेश

पिकनिकसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 18 लोकांना जलसमाधी

Spread the love

सियालकोट /नवप्रहार ब्युरो

                  पिकनिकसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 18 लोक नदीला आलेल्या अचानक पुरामुळे वाहून गेले आहेत. त्यातील सात लोकांचे मृतदेह सापडले असून अन्य लोकांचा शोध सुरू आहे. बचाव पथक वाहून गेलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सियालकोट येथील एकाच कुटुंबातील 18 जण शुक्रवारी सकाळी स्वात नदीच्या खोऱ्यात पिकनिकला गेले होते. यावेळी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. यामुळे नदीला पूर आला आणि पुराच्या पाण्यात 18 जण वाहून गेले. वाहून गेलेल्यांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ स्वात खोऱ्यात ही घटना घडली. बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close