हटके

लोकांनी अजगराचे पोट फाडले आणि त्यातून जे निघाले ते पाहून सागळ्यांना बसला धक्का

Spread the love

नवी दिल्ली /नवप्रहार मीडिया नेटवर्क 

          जसजशी मानवी वस्ती वाढत आहे. तसतसे जंगले  कमी होत चालली आहेत.  वन्यप्राण्यांचा निवासी एरिया कमी झाल्याने वन्यजीव मानवी वसाहतीत प्रवेष  करीत आहेत. आणि त्यामुळे वन्यप्राण्यांच्या मानवावर हल्ल्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. आणि मानवाला आपला जीव गमवावा लागत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ जुना असला तरी वन्यजीव ज्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा समावेश असतो काय करू शकतात याची प्रचिती येते. चला तर जाणून घेऊ या काय आहे प्रकरण ?

जंगलात राहणारे अजगर बहुधा लहान प्राण्यांना त्यांची शिकार बनवतात. पण आता माणसाने जंगल तोडून त्यात आपलं घर बनवायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत महाकाय साप आता माणसांच्या जवळ पोहोचायला लागले आहेत. याच कारणामुळे मानवांवर अजगराच्या हल्ल्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.काही काळापूर्वी सोशल मीडियावर एका व्यक्तीला अजगराने गिळल्याची बातमी व्हायरल झाल्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

23 फुटांच्या अजगराने दिवसाढवळ्या एका माणसाला गिळलं होते. हा व्यक्ती बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू केला असता त्याच्या मित्रांना एक मोठा अजगर दिसला. त्याचं पोट खूप फुगलेलं दिसत होतं.

घाईघाईत लोकांनी अजगराला पकडून त्याचं पोट फाडलं. त्याच्या पोटात ज्या अवस्थेत शेतकऱ्याचा मृतदेह सापडला ते पाहून लोक आश्चर्यचकित झाले.शरीरातून ‘मृत्यू’ची टिकटिक! महिलेच्या छातीत ‘बॉम्ब’; जो फुटू शकतो कधीहीहे प्रकरण इंडोनेशियातून समोर आलं होतं. 25 मार्च 2017 रोजी अकबर नावाच्या व्यक्तीला पश्चिम सुलावेसीमध्ये शेवटचं पाहिलं गेलं होतं.

कामानिमित्त तो जंगलात गेला होता. त्याच्या साथीदारांनी तो बराच वेळ दिसला नाही, तेव्हा त्याचा शोध सुरू झाला. बऱ्याच वेळाने रात्री 10 वाजता लोकांची नजर एका मोठ्या अजगरावर पडली. त्याचं पोट पाहिल्यानंतर सापाने या व्यक्तीला गिळलं असल्याचा संशय लोकांना आला.

या कारणास्तव त्यांनी सापाचं पोट फाडण्याचा निर्णय घेतला.लोकांनी मोठ्या शिकारी चाकूने अजगराचे पोट कापले. यानंतर लोकांनी जे दृश्य पाहिलं त्याने सर्वांनाच धक्का बसला. 25 वर्षीय अकबरचा मृतदेह त्याच्या कपड्यांसह सापाच्या पोटात सापडला होता. एवढंच नाही तर अजगराने अकबरला त्याच्या बुटांसह गिळलं होतं. लोकांनी लगेच त्याला बाहेर काढलं आणि त्याचे फोटो काढायला सुरुवात केली. अकबरची पत्नी मुनू हिलाही या फोटोंद्वारेच याची माहिती मिळाली. पुन्हा एकदा हे विचित्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close