शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
माजी लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवसनिमित्ताने शिवसेना धामणगाव तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.*
*सर्वप्रथम माताजी देवस्थान धामणगाव रेल्वे येथे जिल्हाप्रमुख मनोज कडू यांच्या हस्ते करून मा श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या उदंड व निरोगी आयुष्यासाठी महाआरती करून प्रार्थना करण्यात आली.* तसेच वृक्षारोपण करण्यात आले. धामणगाव ग्रामीण रुग्णालय मध्ये जाऊन रुग्णांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी तालुका प्रमुख निलेश मुंदाने, शहर प्रमुख नरेंद्र देऊळकर, माजी शहर प्रमुख गोपाल मोकलकर, शहर संघटक अशोक कुचेरिया,मा युवासेना उपजिल्हाप्रमुख अमोल पवार, गजाननराव भेंडे, विनोद शेलोकार, सुरेश जुनघरे, संतोषराव गावंडे, रवी काटकर,निलेश ढाले, सुशील कडू, अनिल वानखडे, अनिल इंगळे, राहुल कडू,हरीश पणपलिया,अजय लोया, अतुल चौधरी, प्रशांत शिंदे, प्रमोद कागदे, निखिल चिरके, मधुर पालिवाल यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला…