सामाजिक

पालकांनो सावध : अल्पवयीन मुलाच्या हातात दुचाकी द्याल तर, होणार कारवाई

Spread the love

 

ठाणेदार हृदयनारायण यादव यांचे आवाहन

लाखनीत मिळतेय अपघाताला निमंत्रण
शमीम आकबानी
——- | वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही अल्पवयीन मुलांना गाडी देणाऱ्या पालकांवर आता कायदेशीर कारवाई होणार असून, लाखनी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार हृदयनारायण यादव यांनी शनिवार दि. 7 सप्टेंबर रोजी आवाहन केले आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हातात गाडीची चावी देणाऱ्या पालकांनी सावधान राहावे, असा इशाराच ठाणेदार यादव यांचेकडून देण्यात आला आहे.

मोटर वाहन कायद्यानुसार 18 वर्षांवरील मुलांना दुचाकी चालविण्याची परवानगी आहे. मात्र, लाखनी शहरातील रस्त्यांवर शाळकरी अल्पवयीन मुले सर्रास भरधाव वेगाने दुचाकी चालविताना दिसून येत आहेत. कायदा माहीत असतानाही पालक अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देत आहेत. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
मागील दोनमहिन्यापूर्वी 13 वर्षीय एकांत थानथराटे या विद्यार्थ्यांचा अपघात झाला होता. दरम्यान, डोक्याला जबर मार लागल्यामुळे लाखो रुपयांचा खर्च लागला. या अपघातात एकांतचा जैसे तैसे प्राण वाचला.

योग्यवय आणि वाहन परवाना मिळाल्यानंतरच मुलांनी वाहन चालविणे अपेक्षित आहे. मात्र, हौस भागविण्यासाठी अनेक पालक मुलांना दुचाकी खरेदी करून देतात. शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर ही अल्पवयीन मुले सुसाट वेगाने गाडी चालविताना दिसून येतात. यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या इतरांच्या जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो.

मात्र, पालकांना याचा विसर पडला आहे. शहरात भरधाव वेगाने गाडी चालविण्याचे व ट्रिपल सीट दुचाकी चालविणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. पालकांनी लहान मुलांना गाडी चालविण्यास देऊ नये, अन्यथा दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांनी दिला आला आहे.

बुलेटस्वारांचे कर्णकर्कश हॉर्न

शहरात काही बुलेटस्वार कर्णकर्कश हॉर्न वाजविताना दिसून येतात. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अगोदरच गाडीचा धडकी भरविणारा आवाज, त्यात सायलेन्सरमध्ये विनापरवाना बदल करून फटाक्यांसारखा निघणारा आवाज, या व्यतिरिक्त कर्णकर्कश स्वरूपाचे हॉर्न वाजविले जात असल्याने नागरिकांचा त्रास वाढला आहे. अशा दुचाकीधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close