श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्य
रासेयो: एक युवा चळवळ या विषयावर व्याख्यान संपन्न
*अंजनगाव सुर्जी: / प्रतिनिधी
भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालय अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता एक महत्त्वाची केंद्रीय योजना म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सन १९६९ साली २४ सप्टेंबर पासून देशांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना लागू करण्यात आली. म्हणूनच दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. श्रीमती राधाबाई सारडा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती येथे रासेयो पथकामध्ये एकूण दोनशे स्वयंसेवक कार्यरत आहेत. राष्ट्रीय सेवा योजना दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बशिष्ठ चौबे व रासेयो संचालक डॉ. निलेश कडू (संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती) यांच्या मार्गदर्शनात रासेयो पथक व महाविद्यालयीन माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रासेयो: एक युवा चळवळ या विषयावर मा.डॉ.अंबादास घुले (माजी जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.अंशुमती कहाणे, प्रमुख वक्ते मा.डॉ.अंबादास घुले, डॉ.महेंद्र गिरी (समन्वयक, माजी विद्यार्थी संघटना) तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.नितीन घोडीले, डॉ. अनिकेत भुयार, डॉ.ममता येवतकर, डॉ.नविता मालाणी तसेच विद्यार्थी प्रतिनिधी निशांत ठाकरे व कु.संस्कृती करमसिद्धे आदींची उपस्थिती लाभली.
डॉ.घुले यांनी आपल्या मार्गदर्शनात रासेयो: एक युवा चळवळ या विषयावर मार्गदर्शन करत असताना विद्यार्थी जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व या विषयावर वेगवेगळी उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. रासेयो स्वयंसेवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, व्युक्तीमत्व विकास, आंतरधर्मीय सलोखा तसेच सामाजिक बांधिलकी यासारखी सामाजिक मूल्य रुजवण्यासाठी रासेयो एक व्यासपीठ असून विद्यार्थ्यांनी अश्या संधीच स्वतःच्या सर्वांगीण विकासाकरिता उपयोग करावा असे विचार यावेळी त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.क्षितिजा जैन हिने तर आभार प्रदर्शन शेख हसन यांनी केले. कार्यक्रमादरम्यान डॉ.प्रतिभा थोरात, डॉ.कविता मलोकार, प्रा.सतिष बेलसरे व डॉ. विवेक पाटिल आदींची उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान संत गाडगे बाबांवर आधारीत निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक यश कपले, द्वितीय क्रमांक श्रद्धा इखार, तृतीय क्रमांक साक्षी अस्वार तर प्रोत्साहनपर बक्षीस कु.प्रणवती उके, कु.हिना परविन शेख झुलफोद्दीन व कु.समीक्षा कंकाळे आदींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता डॉ. मंगेश डगवाल, डॉ.नितिन सराफ, डॉ.सतिष मार्डीकर, डॉ.समिर बिजवे, श्रीमती अर्चना चव्हाण, दिपमाळा बेलसरे, रासेयो स्वयंसेवक किशोर गलांडे, साक्षी सोळंके, जय बोरसे, शितल नाईक, रेणुका जोशी, श्रेया बलांग, चेतन दामधर, निखिल सरकटे, संगम इंगळे, ईश्वरी पाटील, हर्षदा पटेल व भार्गवी सरकटे आदींचे सहकार्य लाभले.