हटके

गर्भधारणा होत नसल्याने जेव्हा तो पत्नीला घेऊन डॉक्टर कडे गेला तेव्हा समोर आले भलतेच सत्य

Spread the love

गुजरात / नवप्रहार डेस्क

              लग्नाला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून देखील पत्नी ल दिवस जात नव्हते. त्यामुळे पती तिला घेऊन डॉक्टर कडे गेला असता भलतेच सत्य बाहेर आले. वैद्यकीय रिपोर्ट पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्याला गंडविल्या गेल्याचे लक्षात आले. आणि त्याने पोलिसात धाव घेतली.

या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, त्याची त्याच्या भावी पत्नीशी मे 2023 मध्ये ओळख झाली होती. ‘तिच्या बायोडेटात तिची जन्मतारीख 18 मे 1991 दाखवली होती, ज्यामुळे ती माझ्यापेक्षा 18 महिन्यांनी लहान आहे. तिच्या कुटुंबियांची भेट झाल्यानंतर आमचे लग्न 19 जून 2023 रोजी निश्चित झाले. मुलीच्या कुटुंबीयांनी लग्न पालनपूरच्या गावात व्हावे, अशी विनंती केली,’ असे त्याने एफआयआरमध्ये म्हटले आहे.

‘अनेकदा विनंती करूनही, तिच्या कुटुंबाने वय आणि शिक्षणाचा पुरावा देण्यास विलंब केला. लग्नाच्या दिवशी, लग्न समारंभात, त्यांनी तिचा शाळा सोडल्याचा दाखला आणि पासपोर्टच्या प्रती तिच्या नवऱ्याच्या कुटुंबियांना दिल्या, ज्या समाजाने खऱ्या असल्याचे गृहीत धरत त्यांचा स्वीकार केला. माझ्या पत्नीची जन्मतारीख 18 मे 1991 अशी मॅरेज रजिस्टरमध्ये नोंदवण्यात आली होती,’ असेही त्याने पोलिसांना सांगितले.

प्रयत्न करूनही गर्भधारणेच्या प्रयत्नांना अपयश

महिलेने मूळ कागदपत्रे दिली नाहीत. महिनोंमहिने प्रयत्न करूनही या कपल्सच्या गर्भधारणेच्या प्रयत्नांना अपयश आले नाही. ‘मला किंवा घरी इतर कोणालाही न सांगता, माझी पत्नी आणि माझी वहिनी तपासणीसाठी जुहापुरा येथील डॉक्टरांकडे गेली. तथापि, तिने मला रिपोर्ट सांगितला नाही, नंतर सप्टेंबर 2023 मध्ये, आम्ही पालडीतील स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सोनोग्राफी रिपोर्टनुसार माझ्या पत्नीच्या वयात 40 ते 42 व्या वर्षीची लक्षणे दिसून येत आहेत. तो म्हणाला की, तिला नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊ शकणार नाही, असे त्याने एफआयआरमध्ये म्हटले आहे.

तिच्या भावांनी अधिकृत कागदपत्रांमध्ये तिची जन्मतारीखच बदलली

यानंतर या व्यक्तीने जुहापुराच्या डॉक्टरांकडून आपल्या पत्नीचा वैद्यकीय रिपोर्ट मिळवला अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. त्याने मिळवलेला रिपोर्ट आणि निष्कर्ष स्त्रीरोगतज्ज्ञांच्या रिपोर्टशी जुळले. ‘लग्नानंतर, जेव्हा जेव्हा मी लग्नाची अधिकृतपणे नोंदणी करण्यासाठी आणि बँकिंग कारणांसाठी मूळ कागदपत्रे मागितली, तेव्हा माझ्या पत्नीने ते देण्याचे टाळले. सप्टेंबरमध्ये ती तिच्या पालकांच्या घरी परतली. जेव्हा मी चौकशी केली तेव्हा मला कळले की त्याच्या भावांनी अधिकृत कागदपत्रांमध्ये तिच्या जन्मतारखेशी छेडछाड केली आहे आणि ती 18 मे 1985 अशी बदलून 18 मे 1991 ती अशी दर्शविण्यात आली आहे.’

भावडांनी दिली फसवणुकीची कबुली

याबाबत त्याने त्याच्या पत्नीच्या भावंडांकडे चौकशी केली असता त्यांनी फसवणूक झाल्याची कबुली दिली आणि माफीही मागितली, त्याची कबुली तक्रारदाराने दोन तासांच्या ऑडिओमध्ये रेकॉर्ड केली आहे. पतीने असाही आरोप केला आहे की, लग्नानंतर त्याची पत्नी अनेकदा तिच्या आई-वडिलांच्या घरी जात असे. अनेकदा जाताना त्याने आणि त्याच्या कुटुंबाने तिला दिलेल्या मौल्यवान वस्तू ती सोबत घेऊन जात असे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close
I3