चित्रकार सुनिल दाभाडे यांनी चक्क बोरांचा वापर करुन साकारली प्रभू श्री रामांची भव्य मोजेक पोट्रेट
जगातील पहिला आगळा प्रयोग करणारे चित्रकार सुनिल दाभाडे
22 जानेवारी उल्हासित करणारा दिवस सर्वज भारतात राममय वातावरणामध्ये पंतप्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांचा शुभहस्ते अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. यालाच उद्देश्युन
मानव सेवा विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक,चित्रकार, सुनिल दाभाडे यांनी चक्क बोरांचा वापर करुन साकारली प्रभू श्री रामांची भव्य मोजेक पोट्रेट प्रतिभा .
शबरीच्या बोरांने सुखावलेल्या श्री रामाचे दर्शन घडवून दिले.यासाठी त्यांनी रामाला वंदन करण्यासाठी ज्या बोराने रामाला सुखावले होते असे बोर हे करू घेत त्यावर चक्क बोरांचा वापर करुन साकारली प्रभू श्री रामांची भव्य मोजेक पोट्रेट पेटींग साकरली.
श्री रामाची मोजेक पोट्रेट पेटींग 2 फुट रुंदी व 4 फुट लांबी मोजेक प्रकारातील कलाकृती साकारलेली आहे. ही कलाकृती तयार करण्यासाठी 2 तास ,1मिनिट ,24 सेंकट लागले आहे.
कलाकृती 4 किलो बोर लागले आहे. एकुण बोरांची संख्या – 1111लागले आहे.
चित्रकार सुनिल दाभाडे हे नेहमीच काही तरी आगळावेगळा प्रयोग करत असतात.तसेच नाविण्यपूर्ण चित्र काढण्यासाठी सर्वीकडे प्रसिध्द आहेत.त्याचे यापुर्वी सुध्दा अनेक चित्र प्रसिध्द आहे ते असे तव्यावर कवयित्री बहिणाबाई चौधरी चे चित्र,महामानव डा.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधुन 1111शब्दापासून सुरेख चित्र रेखाटले आहे. पाटीवरील सावित्रीबाई फुले यांचे सुंदर चित्र,
नवरात्र उत्सवाचे अवचित साधून चक्क दगडावर देवीचे मनमोहक व आकर्षक असे चित्र रेखाटले नवरात्र निमित्त दगडावर देवीची मनमोहक असे चित्र काढले तसेच याआधी ही त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले.जसे ज्वारीचा भाकरीवर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुंदर चित्र रेखाटले होते. त्या पेंटीगची नोंद ओ.एम.जी नॅशनल बुक रेकॉर्ड व वर्ल्ड रेकार्ड लंडन नवरात्रात चक्क सुपारी वर नऊ दिवसाचे नऊ देवीचे चित्र काढले होते.
कोरोना काळात सुनिल दाभाडे सरांनी चौकाचौकात जाऊन रस्त्यावर कोरोना विषयी चित्र काढुन जनजागृती केले.
असे नवनवीन उपक्रम राबवून चित्रकार सुनिल दाभाडे यांनी आपले व शाळेचे नाव जगाच्या पाठीवर नेले आहे.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस.डाकलीया,मानद सचिव विश्वनाथ जोशी ,सर्व पदाधिकारी, सदस्य प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका माया अंबटकर ,माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
निवृत्त प्राथमिक शिक्षणाधिकारी आप्पासाहेब निलकंठ गायकवाड ,साहित्यिक व निवृत्त माध्य शिक्षणाधिकारी शशिकांत हिगोंणेकर, निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिध्दार्थ नेतकर
डॉ. अब्दुल कलाम पुस्तक भिशी चे प्रमुख विजय लुल्हे, जनमत प्रतिष्ठान चे अध्यक्ष पंकज नाले ,प्रेमकुमार सपकाळे, सचिन मुसळे ,शाम कुमावत, निरंजन शेलार, मनोज जंजाळकर,अविनाश मोघे, मनोज भालेराव योगेश सुतार या सर्वानी अभिनंदनाचा वर्षाव केला.
या प्रतिमाची आठवण प्रेरणा ही कलाकृती निरंतर देत राहील अशी भावना चित्रकार सुनिल दाभाडे व्यक्त केली आहे.