चार तासासाठी oyo हॉटेल ची रूम केली होती बुक पण त्यानंतर …..
नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया
नविदिल्ली च्या जाफराबाद परिसरातील oyo हॉटेल मध्ये जोडप्याने चार तासांसाठी एक रूम बुक केली होती. ते तेथे आले पण निर्धारित कालावधी संपल्यानतर हॉटेल च्या कर्मचाऱ्यांनी आवाज देऊन देखील त्यांनी दार न उघडल्याने त्यांनीं पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दार तोडताच समोर जे दिसले ते भयानक होते. मौजपूर मेट्रो स्टेशनजवळील ओयो हॉटेल येथे घडली आहे.
पलंगावर महिलेचा मृतदेह होता तर तरुण नायलॉन च्या दोरीने पंख्याला लटकला होता. टेबलावर ठेवलेल्या सुसाईड नोट वरून महिलेचे नाव आयशा बसंत कुंज गल्ली क्रमांक-10, लोणी येथील रहिवाशी तरुणाचे नाव सोहराब (वय 28 वर्ष) रा. मेरठ समजले.
दोघांनी 4 तासांसाठी रूम बुक केली होती. मात्र, त्यांची वेळ संपल्यानंतरही बराच वेळ दोघे रुमबाहेर न आल्यामुळे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी 7 वाजून 45 मिनिटांनी दरवाजा ठोठावला. मात्र, रुमच्या आतून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी यासदंर्भात पोलिसांना कळवलं. पोलीस आल्यानंतर त्यांच्या समक्ष रुमचं दार उघडण्यात आलं.
रुमचा दरवाजा उघडल्यानंतर समोर धक्कादायक दृष्य पाहायला मिळालं. रुममध्ये दाखल झालेल्या टीमला सोहराब नायलॉनच्या दोरीनं पंख्याला लटकत असल्याचं पाहायला मिळालं. तर आयशा बेडवर मृतावस्थेत आढळून आली. आयशाच्या मानेवरही जखमेच्या खुणा आढळल्या. तसेच, तिच्या शेजारी पलंगावर अर्ध्या पानाची सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये दोघांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं लिहिलं होतं. त्यात दोघांनी एकत्र जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचं लिहिलं होतं. अद्याप दोघांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत काहीच माहिती मिळालेली नाही.
आयशाच्या पतीची कसून चौकशी
आयशाला दोन मुलं असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. एक 9 वर्षांचा मुलगा आणि 4 वर्षांची मुलगी अशी दोन मुलं आहेत. तिचे पती मोहम्मद गुलफाम (28 वर्ष) हे जिम प्रोटीन सप्लिमेंट विकतात. पोलिसांनी याप्रकरणी आयशाच्या पतीची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांकडून सोहराबच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात असून, पोस्टमार्टमनंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी स्थानिक रुग्णालयात पाठवले आहेत. दोघांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.