शैक्षणिक

श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात दीक्षारंभ-स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम-२०२३ चे आयोजन

Spread the love

अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे

अंजनगाव सुर्जी: महाविद्यालयात नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरणात सहज जुळून घेता यावे, त्यांना सोयीस्कर वाटण्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक आवडी आणि क्रियाकलापांचा शोध घेण्याकडे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी, स्पर्धा कमी करण्यासाठी आणि त्यांना उत्कृष्टतेसाठी कार्य करण्यास मदत करण्यासाठी, त्यांच्यातील आप-आपसातील नातेसंबंध वाढवण्यासाठी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संबंध निर्माण करण्यासाठी, नवीन क्षितिजे उघडण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे दीक्षारंभ-स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम या संकल्पनेची रचना करण्यात आली. या अनुषंगाने श्रीमती राधाबाई सारडा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती येते ३० तासांचा दीक्षारंभ-स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम संस्थेचे सचिव मा.डॉ. अमर सारडा यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला. त्यामधील मुख्य कार्यक्रम दि. ८ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान संपन्न झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटनास अध्यक्ष म्हणून श्री संजय सारडा (सदस्य, श्री सारडा एजुकेशन सोसायटी), प्रमुख पाहुणे डॉ. राजीव बोरकर (संचालक, विद्यार्थ्यांचा विकास / विद्यार्थ्यांचे समुपदेशन कक्ष, सं.गा.बा.अ.वि.), प्राचार्य डॉ. बशिष्ठ चौबे, डॉ. मंगेश डगवाल (समन्वयक,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष) तसेच डॉ.सतिष मार्डीकर (समन्वयक, दीक्षारंभ-२०२३) आदींची उपस्थिती लाभली.
डॉ. बोरकर यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासात दीक्षा ग्रहण करताना सर्वांगीण विकास करून एक आदर्श निर्माण करावा. आपल्या शिक्षणाचा फायदा सर्वसामान्यांकरीता करा करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजना व विद्यार्थ्यांकरिता विद्यापीठ स्थरावर तसेस राष्ट्रीय स्थरावर असलेल पुरस्कार याविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. चौबे यांनी आपल्या मार्गदर्शनात दीक्षारंभ कार्यक्रमचा हेतू विविध उदाहरणांसह विद्यार्थ्यांना विशद केला. विद्यार्थ्यांनी संस्कार ग्रहण करतानाच राष्ट्रप्रेमासह दीक्षित देश निर्माण व्हावा असे आवाहन त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना केला. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना महाविद्यालयाचा माहितीपट दाखविण्यात आला.
कार्यक्रमानंतर नवप्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसराची सहल करविण्यात आली. यामध्ये एकूण ४०० पेक्षा जास्त महाविद्यालयांनी विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन करिता डॉ. सत्येंद्र गडपायले, डॉ. महेंद्र गिरी, प्रा. सुरेंद्र किन्हीकर, डॉ. नितीन सराफ, प्रा. डॉ. बिना राठी, प्रा. प्रतिभा आवंडकर, डॉ. प्रेरणा भटकर, डॉ. सुवर्ण झिलपे तसेच दीक्षारंभ आयोजक समिती सदस्य डॉ. विवेक पाटील, प्रा. नविता मालाणी, डॉ. संगीता छाबा, डॉ. अनिकेत भुयार, प्रा. राम कुलकर्णी व डॉ. नितिन घोडीले आदींचे सहकार्य लाभले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close