शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवा सेनेच्या वतीने उद्या तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन

शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
नांदगाव खंडेश्वर / प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवा सेनेच्या वतीने उद्या तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती युवा सेना जिल्हा प्रमुख प्रकाश मारोडकर यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना अतिवृष्टीची सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्यात यावी.ता लुक्याला सरसकट पीक विमा लागू करावा प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील उंबरठा उत्पनाची अट रद्द करण्यात यावी शासनाने नाफेड मार्फत ७ हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीन शासकीय खरेदी करावी व १० हजार रुपये प्रति क्विंटल कापूस खरेदी करावा.
या मागणीला घेऊन युवा सेनेच्या वतीने उद्या दि.१० नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय नांदगाव येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवण्याची विनंती युवा सेना जिल्हा प्रमुख प्रकाश मरोडकर यांनी केली आहे.