छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : धनोडी ( बहा) येथे दि.
19/02/2024 ला समर्पण सेवाभावी संस्था तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला उपस्थित दीपक काळे (अध्यक्ष) , सौ. माधुरी पंकज कावळे ( सरपंच) , रवींद्र नाखले (उपसरपंच) व मंदार अभ्यंकर वर्धा , देवेंद्र गुल्हाणे, याचे हस्ते फोटोपुजन करून चित्रकला व नृत्य स्पर्धा घेण्यात आली. चित्रकला स्पर्धेत निहार जयसिंगपूर (प्रथम), जुही कामठे (द्वितीय), प्रथम खरवडे (तृतीय) तर प्रोसहन बक्षिसे चैतन्य नेहारे,ओवी जुवारे,याचिका जयसिंगपूरे, सानिका राऊत, शिद्धी वडाळकर, तयबा पठाण, अंश घोडे तर नृत्य स्पर्धेत वडाळकर स्टार ग्रुप (प्रथम), दिपाली कोरे(द्वितीय), संस्कृती नाखले(तृतीय) तर प्रोत्साहन बक्षिसे मृण्मयी राऊत, श्रावणी जूनेवार, निशिता इंगळे यांना पारितोषिक व प्रमाणपत्रे देण्यात आले. दि. 20/02/024 ला सत्यपाल महाराज याचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला होता.सत्यपाल महाराज यांनी लहान मुलावरील संस्कार , व्यसन मुक्ती बाबत प्रबोधन केले. कार्यक्रमला नितीन झोपाटे, पवन बोधनकर, प्रफुल जूनेवार, अतुल जयसिंगपुरे ,सचिन झोपाटे, अंकुश बोबडे, श्रीधर जनुस्कर, प्रफुल राऊत, रोहन बोधनकर, शुभम कावळे, सचिन कावळे, ऋषी निखार , जय बोधनकर यांनी सहकार्य केले तर संचालन अमोल नाखले तर आभार महेश राऊत यांनी केले.