सामाजिक

अंजनगाव सुर्जी येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा

भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ. विलास कविटकर यांनी केला पत्रकारांचा सन्मान

Spread the love

अंजनगाव सुर्जी प्रतिनिधी / मनोहर मुरकुटे

महाराष्ट्र शासनाने ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून घोषित केला आहे.दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी भारतातील पहिले नियतकालिक सुरु केले असल्यामुळे महाराष्ट्र राज्यात हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.दिनांक ६ जानेवारी रोजी अंजनगाव सुर्जी शहरातील श्री.संत रुपलाल महाराज कॉम्प्लेक्स पान अटाई येथे दि.पॉवर ऑफ मिडिया तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना अंजनगाव सुर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पत्रकार दिनाचे औचित्य साधून डॉ.विलास कविटकर भाजपा सरचिटणीस (महामंत्री) अमरावती जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ.विलासराव कविटकर यांनी उपस्थित पत्रकारांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ तसेच पेन व डायरी देवून यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्राम वैभव साप्ताहिकचे मुख्य संपादक शिवदासजी मते,प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.विलासराव कविटकर, ठाणेदार प्रकाश अहिरे,माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक देविदासजी नेमाडे,ज्येष्ठ पत्रकार सुरेशदादा साबळे, दी.पॉवर ऑफ मिडियाचे तालुकाध्यक्ष मनोहर मुरकुटे,अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुधाकर टिपरे विचार पिठावर उपस्थित होते.याप्रसंगी मान्यवरांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर,पहिल्या महिला संपादिका तानुबाई बिर्जे,राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला आभिवादन केले.तसेच यावेळी तालुक्यातील समस्त उपस्थित पत्रकारांना मान्यवरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून संबोधित केले.तसेच उपस्थित पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले.भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ.विलासराव कविटकर यांनी पत्रकारितेची जाणीव ठेवून वतीने उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले.कार्यक्रमाचे संचलन मनोज मेळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिल माकोडे यांनी केले.कार्यक्रमाला पत्रकार गजानन चांदुरकर,अशोक पिंजरकर,जयेंद्र गाडगे,प्रविण बोके, सुनिल माकोडे,गजेन्द्र मंडलीक,रविंद्र वानखडे,रमेश सावळे,महेंद्र भगत, प्रेमदास तायडे,मनोज मेळे,सचिन इंगळे,पंकज हिरुळकर,कुशल चौधरी, अनंत मोहोड,महेश वाकपांजर, महेश वाकपांजर,मंगेश इंगळे, नागेश गोळे, शाम कळमकर,दिलीप साबळे, श्रीकांत नाथे सह शहर व तालुक्यातील समस्त पत्रकार उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Sumit Baniya

Related Articles

Back to top button
Close
Close