दि.26 ऑक्टोबर रोजी हिट्स ऑफ शंकर जयकिशन कार्यक्रमाचे आयोजन
नगर – येथील गायनॅक सोसायटीच्या वतीने प्रसिद्ध संगीतकार स्व.शंकर जयकिशन यांच्या सुरेल गाण्यांची मैफिल दि.26 ऑक्टोबर 2024 रोजी माऊली सभागृह, सावेडी रोड, नगर येथे सायं.6.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गायनॅक सोसायटीचे अध्यक्ष डॉ.गणेश बडे, सक्रेटरी डॉ.अमित करडे यांनी दिली.
या संगीत मैफिलीत स्व शंकर जयकिशन यांच्या सुमधूर चित्रपट गीतांचा नजराना रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमामध्ये व्हाईस ऑफ मुकेश या नावाने प्रसिद्ध असलेले अहमदाबादचे अॅड. मुख्तार शाह सहभागी होणार आहे. तसेच पुण्याचे प्रसिद्धी गायक श्री विवेक पांडे, सौ.स्वरदा गोडबोले, राजेश्वरी पवार,नगरचे गायक डॉ.सत्तार सय्यद सहभागी होणार आहे.
या कार्यक्रमामध्ये 20 वादक कलाकार असणार आहेत. पुणे येथील अमन सय्यद मुझिक अॅरेंजर असणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन सौ.निरजा आपटे ह्या करणार आहेत. ह्या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी डॉ.अमित करडे – मो. 9850202626, विशाल अरकल – मो.8668706931 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गायनॅक सोसायटीच्या वतीने करण्यात आले.