विशेष

वाचा मटणाच्या नावाखाली कुठे ग्राहकांना वाढण्यात येत आहे मांजराचे मांस

Spread the love

                    जगाच्या पाठीवर असलेल्या देशात वेगवेगळ्या जनावरांचे मास खाण्याची प्रथा आहे. जास्तीत जास्त देशात बकऱ्याचे, कोंबड्यांचे ,डुकराचे आणि हरीण सारख्या वण्या जीवाचे मांस खाल्ले जाती.जगात चीन असा देश आहे येथे कुठल्याही प्राण्याचे मांस आश्चर्याची बाब म्हणजे येथे सापाचे सूप सुध्दा बनवले जाते. मागील काळात येथे कुत्याचे मांस खाल्ले जात असल्याच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या. आता या देशातून नवीन बातमी समोर येत आहे. येथे मटण आणि पोर्क क्या नावाखाली मांजराचे मांस विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मांजराचे मांस मोजक्याच देशात खाल्ले जाते ही विशेष.

मांजरांबाबत असा भयानक प्रकार होत असल्याचे समजल्यानंतर संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. हे प्रकरण झांगजियागँग (Zhangjiagang, China) नावाच्या शहरात घडले आहे. पोलिसांनी १००० पेक्षा जास्त मांजरांची सुटका करून त्यांचा जीव वाचवला आहे. या मांजरांना कत्तलीसाठी कत्तलखान्यात घेऊन जात होते.

मांजराचे मांस स्वस्तात विकले जात असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. अर्धा किलो मांसाची किंमत ३०० ते ३५० रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मांजरांची कत्तल होण्यापासून वाचवण्यात यश आले आहे. सुटका करण्यात आलेल्या मांजरांना निवारागृहात (Shelter home) ठेवण्यात आले आहे. चीनमधील अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याचा विरोध केला जात आहे.

झांगजियागँगमधील सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आले की, परिसरातून मांजर गायब होत आहेत. या मांजरांना लाकडी पेटीत बंद करून कुठेतरी घेऊन जात होते. मात्र, पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करत मांजरांचे प्राण वाचवण्यात यश आले. मांजरांना मारून मांस विकण्याची योजना यशस्वी झाली असती तर आरोपींना १७ लाखांहून अधिक रक्कम मिळू शकली असती. पण हा प्रयत्न पोलिसांच्या प्रयत्नांमुळे अयशस्वी ठरला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close