रोजगार प्राप्त करुन देन्यात ग्रामीण कोकन बॅकेचे योगदान
*महाराष्टात दूसरा क्रमांक*
जील्ह्यातील 13 शाखा व्यवस्थापकाचा जिल्हाधिकार्याकडुन सन्मान
अकोला / प्रतिनिधी
रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला प्राप्त होऊन ग्रामीण भागाचा विकासामध्ये योगदान देणाऱ्या १३ शाखा व्यवस्थापकांचा क्षेत्रीय व्यवस्थापक श्री गटकळ यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. या मध्ये कु. शारदा देशमुख हिचा समावेश असून बार्शीटाकळी या भागामध्ये उत्कृष्ठ काम केल्या बद्दल कौतुक करण्यात आले. अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती या उद्दिष्ट पूर्तीसाठी विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांचा जिल्हा उद्योग केंद्र यांचे मार्फत स्वागत करण्यात आले या मध्ये क्षेत्रीय व्यवस्थापक सर्जेराव गटकळ अजिंक्य खानझोडे-नोडल अधिकारी, शाखा व्यवस्थापक अमोल कदम-हिवरखेड, शारदा देशमुख (जोशी)-बार्शीटाकळी, विठ्ठल माळी- उगवा, मयूर भाकले-अकोला जुने शहर शाखा, विश्वंभर काळे-गायगाव श्रीमती अरुणा खेडकर-कान्हेरी सरप, अरुण काळे-आलेगाव, निलेश्कुमार खंडारे-अकोट व ऋषिकेश देशपांडे आपातापा यांचा समावेश आहे.
या वेळी श्री. संतोष कोरपे, अध्यक्ष, ADCC, VKGB चे RM/ZM, स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आणि लीड बँक व्यवस्थापक सेन्ट्रल बँक अकोला आणि सर्व बँकर्स यासाठी उपस्थित होते. या यशाबद्दल जिल्हाधिकारी कुंभार यांनी सर्व बँकर्सचे अभिनंदन व कौतुक केले आणि या वर्षातही अशीच कामगिरी सुरू ठेवण्याचे आवाहन केले.