क्राइम

अंबड  वासीयांसाठी थर्स डे ठरत आहे ‘ब्लॅक थर्स डे ‘

Spread the love

नाशिक / नवप्रहार मीडिया

              थर्स डे अंबड वासीयांसाठी ब्लॅक थर्स डे ठरत आहे.कारण  मागील तीन गुरुवार पासून शहरात खुनाच्या लागोपाठ तीन घटना घडल्या आहेत. संदीप प्रकाश आठवले २३ पेलिकन पार्क जवळ, नवीन नाशिक ) असे मृत तरुणाचे नाव असून सहा तरुणांनी त्याच्यावर हल्ला करून आणि तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याची हत्या केली आहे. या तरुणांनी अवध्या १२ सेकंदात २७ वार करून त्याला संपवले आहे.

भरदिवसा  शिवाजी चौकात व अवघ्या २० फूटावर असलेल्या शिवाजी चौक पोलीस चौकीजवळ खूनाचा थरार घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग तिसर्‍या गुरुवारी अंबडमध्ये तीन खूनाच्या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी व नातलगांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पाच वाजता संदीप चुलतभाऊ सनी राजू आठवले सोबत छत्रपती शिवाजी चौक शॉपींग सेंटर येथे पाणीपुरी खाण्यासाठी आला होता. यावेळी दोन दुचाकीवरून सहा जण संदीपजवळ आले. काही समजण्याच्या आतच टोळक्याने संदीपवर धारदार शस्त्राने २७  सपासप वार केले. त्याला जखमी अवस्थेत मित्रांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ समवेत अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मयत संदीपच्या पश्चात आई, वडील, बहीण भाऊ असा परिवार आहे.

 पोलिसांनी मुख्य आरोपी ओम प्रकाश पवार उर्फ मोठा ओम्या खटकी याच्यासह ओम चौधरी उर्फ छोटा खटकी, साईनाथ गणेश मोरताटे उर्फ मॅग्गी मो-या, अनिल प्रजापती व पार्थ साठे यांना ताब्यात घेतले आहे. तीन आरोपींचा शोध सुरु आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close