सामाजिक

मुख्य रोडच्या कड़ेने वाढलेली काटेरी झुडपे स्वयंस्फूर्तीने कापुन श्रमदानाची दिली अफलातून ओळख

Spread the love

 

प्रा. सुधारकर गौरखेडे सरांचे प्रेरणादायी सराहनीय कार्य

नव प्रहार (  प्रतिनिधी) अनिल डाहेलकर

मुर्तिजापूर : मुर्तिजापूर बस स्टेशन च्या मुख्य रोड ला लागून आणि अकोला कडून मुर्तिजापूर शहरा कडे येणाऱ्या रोडच्या कड़ेने वाढलेली काटेरी बंगाली बाभुळीचे झुडपे येणाऱ्या जाणाऱ्या पदचारी आणि दुचाकी चालकांना त्रासाचेच नाही तर दुखापतीस कारणीभूत झालेली ही झुडपे स्वयंस्फूर्तीने कापुन प्रा.गौरखेडे सर यांनी श्रमदानाचा नवा आदर्श निर्माण केला आहे .

बंगाली बाभुळीचे काटे जर पायात रुतले तर चार पाच दिवस त्यांची ठणक अंग अंगात जडून राहते तर तो काटा पायात खुडला संपुर्ण पाय सडण्यास कारणी ठरु शकतो ‌. पुर्वी अशा या बंगाली काट्या फक्त शाहनूर , पुर्णा आणि त्यांच्या उपनद्यांच्याच किणारी राहायच्या आता यांचे अतिक्रमण शहरात ही अनेक ठिकाणी पाहायला मिळाते .

आपल्या आजू बाजूला असंख्य समस्या आपल्यासह अनेकांना त्रास दायक असतात . त्यातून आपण आपली वाट अलगद काढून मोकळे होते . ते केवळ तात्पुरते .पण जे सजग जागरुक असतात . ते आपलाच नव्हे तर ईतरांचा विचार सदैव ध्यानी ठेवून असतात . आपले
समाजप्रतीचे काही देणे असते हे जाणून आपले कार्य आपली सेवा नित्य निस्सीम श्रध्देने करीत असतात अशा कार्या ची दखल सर्वत्र आफसुकच घेतली जाते.

असेच ऐक निरपेक्ष कार्य नजरेत पडले ते आमच्या नेहरु युवा मंडळ , मुर्तिजापूर चे मार्गदर्शक , प्रकाश वाट अभियानाचे , आंतर भारती तथा रामकृष्ण विवेकानंद मंडळाचे अध्यक्ष प्रा. सुधाकर गौरखेडे सर यांचे कार्य . प्रा. गौरखेडे सर हे संत गाडगे महाराज महाविद्यालयात एन एस एस चे प्रमुख होते . तसेच ज्ञानदानाच्या कार्यतून जरी सेवा निवृत्त झाले असले तरी सेवाभाव अजून ही त्यांच्या अंतरंगी रुढ आहे. समाज सेवा सदोदित घडो जणू हे व्रत च ते निभवत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close