हटके
Related Articles
Check Also
Close
-
अन् त्याने प्रेयसी समोरच सोडला जीव ….!
4 weeks ago
हमीरपूर / नवप्रहार मीडिया
देश विज्ञानात प्रगती करीत असला तरी आजही खेड्यापाड्यात अंधश्रद्धा जनतेच्या मनात घर करून असल्याचे अनेक घटनांवरून दिसुन येते. आणि याच बाबीचा फायदा संधीसाधू लोकं उचलत असल्याचे पाहायला मिळत आहे. नात अनेकवेळा आजाई पडत असल्याने आजी तंत्रिकाकडे गेली. तंत्रिकाने तिच्या आयुष्यात अनेक अडथळे असल्याचे सांगून पूजा करावी लागेल असा उपाय सांगितला. आणि याचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.वाच्यता केल्यास कुटुंबासह तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
अत्याचाराची ही घटना हमीरपूर जिल्ह्यातील चिकासी पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे राहणारी 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी अनेकदा आजारी असायची. पीडितेचे आई-वडील दिल्लीत मजुरीचे काम करायचे. मुलगी गावात तिच्या आजीसोबत राहत होती. एके दिवशी आजीने गावातील तांत्रिक राम स्नेहीला आपल्या नातवाविषयी सांगितले. तांत्रिकाने तिच्या आयुष्यात अनेक अडथळे असल्याचे नाटक केले आणि तिची पूजा करून घेण्यास सांगितले.त्याने मुलीला बोलावून पूजा करून देण्याच्या बहाण्याने तिला जंगलात नेले. जिथे तिला बेशुद्ध करून तिच्यावर अत्याचार केला.
पीडितेने पोलिसांना सांगितले की, तांत्रिक तिच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत असे आणि तिला आपल्या वासनेचे लक्ष्य बनवले. दरम्यान, पीडित मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर तांत्रिकाने तिला गर्भपात करण्यासाठी औषध दिले, मात्र त्यानंतर मुलीची तब्येत बिघडली, त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.पीडितेने संपूर्ण हकीकत कुटुंबीयांना सांगितली आणि त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.अल्पवयीन मुलगी व तिच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर चिकासी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपी तांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीओ सरिला आशिष यादव यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तांत्रिक राम स्नेहीला अटक करण्यासाठी पोलिसांनी एक टीम तयार करून काम सुरू केले आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |