विदेश

या कारणामुळे तरुणी 7 तास खाली डोके वर पाय अवस्थेत होती लटकली 

Spread the love

हंटर व्हॅली / नवप्रहार डेस्क 

                       एक तरुणी हंटर व्हॅली मध्ये खाली डोके वर पाय (उलट्या ) अवस्थेत लटकली होती. या स्थितीत तिला 7 तास लटकून राहावे लागले. त्याचे झाले असे की सदर तरुणीचा मोबाईल दरीत पडला होता. ती काढण्याचा ती प्रयत्न करीत होती. ती त्या स्थितीत खाली गेली खरी पण तिला वर येणे जमले नाही.

20 वर्षीय तरूणी NSW मध्ये दोन डोंगरांच्या मधील एका दरीत पडली. तिचं डोकं खाली आणि पाय होते. याच स्थितीत तिला 7 तास रहावं लागलं. 7 न्यूजच्या रिपोर्टनुसार, 12 ऑक्टोबरला हंटर व्हॅलीमध्ये जेव्हा ही घटना घडली, तेव्हा आपला पडलेला फोन घेण्याचा ती प्रयत्न करत होती.

NSW अॅम्बुलन्स पॅरामेडिक्सला एका बचाव दलासोबत मिळून तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी 500 किलोचा एक मोठा दगड बाजूला करावा लागला. तेव्हा कुठे तरूणीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं.

पॅरामेडिक्स कर्मचारी पीटर वाट्सने सांगितलं की, त्याच्या 10 वर्षाच्या नोकरीत त्याने अशा स्थितीचा कधीच सामना केला नव्हता. त्याने ही स्थिती फारच आव्हानात्मक असल्याचं सांगितलं.

तो म्हणाला की, ‘माझ्या 10 वर्षाच्या नोकरीत मला कधीच अशा स्थितीचा सामना करावा लागला नाही’. तरूणीसोबत असलेल्या मित्रांनी आधी तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. शेवटी त्यांनी मदतीसाठी फोन केला आणि बचाव दल पोहोचलं.

सात तास उलट्या स्थितीत लटकून राहिल्यानंतरही महिेलेला सामान्य खरचटलं. पण तिचा फोन मिळू शकला नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close