क्राइम

या कारणामुळे मुलाने केला आईचा शिरच्छेद ; मुंडके घेऊन गावभर फिरला

Spread the love

सीतापूर (युपी)/ नवप्रहार मीडिया 

               दारूचे व्यसन आणि जमिनीचा वाद इतका विकोपाला गेला की मुलाने शिरच्छेद केला. तो इतक्यावरच थांबला नाही तर आईचे मुंडके घेऊन तो गावभर फिरला. पण पोलीस येताच शेतात जाऊन लपला. ही थरकाप उडवणारी घटना उत्तरप्रदेश च्या सीतापूर येथील आहे.हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण गाव हादरले. लोकांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता, तो आईचे डोके धरून शेतात बसलेला आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, सीतापूर येथील ताळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मिर्झापूर येथे आरोपी दिनेश पासी याची आई कमला देवी यांच्या नावावर 6 बिघा जमीन (तीन एकर) होती. कमला यांचा मुलगा दिनेश याला ही जमीन आपल्या नावावर करायची होती. तर दिनेशची आई कमला 6 बिघ्यांपैकी फक्त 2 बिघा (४० गुंठे) जमीन मागत होती. याचा राग कमला यांचा मुलगा दिनेश याच्या मनात होता.

एक एकर जमीन मागितल्याचा दिनेशला इतका राग आला की त्याने आईची हत्या केली. नशेतच तो घरी आला होता. यानंतर त्याने आईसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेला. याचवेळी दिनेशने घरातील कुऱ्हाड उचलून आई कमला देवी यांचा शिरच्छेद केला. यानंतर तो आईचे मुंडक घेऊन गावात गेला.

पोलिसांनी काय दिली माहिती?

हा प्रकार ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर संपूर्ण परिसरात दहशत पसरली. लोकांनी पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी तातडीने सर्व ठिकाणांची झाडझडती घेतली. त्यावेळी आरोपी शेतात लपलेला आढळून आला. पोलिसांनी आरोपीला शेतातून अटक केली.

आरोपी दिनेश हा आईचे डोके घेऊन शेतात बसलेला आढळून आला. त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close